मदर टेरेसा यांचे आदर्श समोर ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:07 IST2017-08-27T00:06:48+5:302017-08-27T00:07:14+5:30
विद्यार्थ्यांनी मदर टेरेसा यांचा आदर्श समोर ठेवून समाजकार्य करून देशाचा नावलौककि करावा, असे आवाहन प्राचार्य मुज्जमिल सय्यद यांनी केले आहे.

मदर टेरेसा यांचे आदर्श समोर ठेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : विद्यार्थ्यांनी मदर टेरेसा यांचा आदर्श समोर ठेवून समाजकार्य करून देशाचा नावलौककि करावा, असे आवाहन प्राचार्य मुज्जमिल सय्यद यांनी केले आहे.
नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लीश प्रायमरी स्कुल सीबीएसई येथे जागतिक कीर्ती मिळविणाºया जगातील महान महिला मदर टेरेसा यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य पांडूरंग राऊत, पर्यवेक्षिका कछवाह तसेच भारती व्यास उपस्थित होते.
प्रमुख वक्ता कुमेरचंद घोडीचोर यांनी विद्यार्थ्यांना मदर टेरेसा यांच्या जीवनचरित्राविषयी माहितीत सांगितले की त्या एक असामान्य थोर व्यक्ती, एक थोर समाजसेविका होत्या. त्यांनी गोर गरीब, अनाथ अपंग अशा लोकांना आपले समजून प्रेम भावनेने त्यांची सेवा केली. प्रत्येकाला दिलासा, धीर, आधार देऊन त्यांचे अश्रू पुसत होत्या. १९६२ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच त्यांना नोबेल व भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नवजीवन सीबीएसईचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुलमोलाचे सहकार्य केले. संचालन कुमेरचंद घोडीचोर तर आभार राजेंद्र मेश्राम यांनी केले.