३० सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार तुमसर शहरावर करडी नजर
By Admin | Updated: July 19, 2015 00:48 IST2015-07-19T00:48:49+5:302015-07-19T00:48:49+5:30
शहरातील असामाजीक तत्व तथा चोरीच्या घटनेत सातत्याने होणारी वाढ व आरोपींचा शोध लावण्यास होणारा अडथळा दूर...

३० सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार तुमसर शहरावर करडी नजर
नगरपरिषदेचा उपक्रम : चोरांच्या मुसक्या आवळण्यात मदत होणार
तुमसर : शहरातील असामाजीक तत्व तथा चोरीच्या घटनेत सातत्याने होणारी वाढ व आरोपींचा शोध लावण्यास होणारा अडथळा दूर करण्याकरिता मैलाचा दगड ठरणारे ३० सीसीटीव्ही कॅमेरे शहरावर करडी नजर ठेवणार आहे. याच मालिकेत शहरातील १४ चौकांचे सौंदर्यीकरणाचे काम येत्या १० ते १२ दिवसात सुरु करण्यात येत आहे.
तुमसर शहराला कुबेरी नगरी असे संबोधिल्या जाते. या शहरात सराफा दुकाने मोठ्या संख्येने आहेत. मागील वर्षी येथे सराफा व्यवसायीकांचे तिहेरी हत्याकांड घडले. तर दिवसाढवळ्या श्रीराम नगरातील मुख्य रस्त्यावरील सराफा व्यावसायीकांच्या दूचाकीच्या डिक्कीतून ५०० ग्रॅम सोन्याचे दागीने एका टोळीने लंपास केले होते. त्या टोळीचा सुगावा अजूनपर्यंत लागला नाही.
शहरातील अनेक घरफोड्या नित्याचीच बाब ठरली. पोलिसांसमोर येथे आवाहन ठरले. तुमसर नगरपरिषदेने शहराच्या सुरक्षिततेकरिता ३० सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सामूहिक त्याला नगरसेवकांनी मंजूरी प्रदान केली. हे सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य मार्ग तथा गर्दीच्या ठिकाणी शहरात अत्यंत गोपनीय पध्दतीने लावण्यात येणार आहेत. याकरिता स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
१४ चौकांचे सौंदर्यीकरण
शहर स्वच्छ व सुंदर तथा आकर्षीत करण्याकरिता शहरातील १४ मुख्य चौकांचे सौंदर्यीकरण येत्या १० ते १२ दिवसात प्रत्यक्षात कामाची सुरुवात होणार आहे. तुमसर शहराची लोकसंख्या ४२ हजाराच्या वर आहे. तुमसर नगर परिषद ही ब दर्जाची आहे. भंडारा जिल्हयात सर्वात जुनी नगर परिषद म्हणून तुमसराची नोंद आहे.