शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल प्रतीक्षेत पतीचा मृत्यू; दिव्यांग वृद्धेचे झोपडीत वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे इंदिरानगर येथे बैटवार यांचे कुटुंबीय चाळीस वर्षांपासून वास्तव्याला आहे. पती प्रल्हाद बैटवार यांनी घरकुल मिळावे याकरिता प्रयत्न केले होते. परंतु त्यांना घरकुल मिळाले नाही. त्यांचा मृत्यू झाला परंतु जिवंत असताना त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. अता त्यांची दिव्यांग वृद्ध पत्नी व मुलगा आजही चंद्रमौळी झोपडीत वास्तव्य करीत आहे. मात्र, घरकुलाचा लाभ मिळाला नाही. घरकुलासाठी त्यांनी रीतसर अर्ज केला. ड यादीतून ब यादी येण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते; परंतु हे स्वप्न पूर्ण होण्याकरिता अनेक वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. शासकीय घरकुल प्राप्त करण्याकरिता तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे एका गरीब कुटुंबाला सुमारे ३५ वर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. पतीच्या मृत्यूनंतर दिव्यांग वृद्धेला मुलासह चंद्रमौळी  झोपडीतच वास्तव्य करावे लागत आहे. ड यादीतून ब यादीत नाव येण्याकरिता दप्तर दिरंगाई कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे इंदिरानगर येथे बैटवार यांचे कुटुंबीय चाळीस वर्षांपासून वास्तव्याला आहे. पती प्रल्हाद बैटवार यांनी घरकुल मिळावे याकरिता प्रयत्न केले होते. परंतु त्यांना घरकुल मिळाले नाही. त्यांचा मृत्यू झाला परंतु जिवंत असताना त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. अता त्यांची दिव्यांग वृद्ध पत्नी व मुलगा आजही चंद्रमौळी झोपडीत वास्तव्य करीत आहे. मात्र, घरकुलाचा लाभ मिळाला नाही. घरकुलासाठी त्यांनी रीतसर अर्ज केला. ड यादीतून ब यादी येण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.बैटवार कुटुंबातील सपना देवदास बैटवार, देवदास प्रल्हाद बैटवार व रामजी बैटवार यांचे वास्तव्य आहे. या भागातील अनेक नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. मात्र, बैटवार कुटुंब घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. दप्तर दिरंगाई, की स्थानिक गावातील राजकारण, यास कारणीभूत असा प्रश्न आहे. ड यादीतील नावे ब यादीत येण्यासाठी अनेक जण घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात बैटवार यांनी खंडविकास अधिकारी धीरज पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यांनी या प्रकरणात आपण लक्ष घालणार, असे आश्वासन दिले.शासनाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र येथे एका वृद्ध आणि दिव्यांग असलेल्या महिलेला घरकुलासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. आपल्या मुलांच्या सहकार्याने ती शासकीय अधिकाऱ्यांना साकडे घालत आहे. मात्र अद्याप तिचे कुणी ऐकले नाही. तिला कुणी तरी न्याय द्यावा अशी मागणी आहे.

मजुरीवर घरे कसे बांधणार?- बैटवार यांनी ऊन, पाऊस, वादळ, वारा यापासून बचावासाठी गवताची झोपडी तयार केली आहे. पावसापासून बचाव कसा करावा, असा प्रश्न रामजी यांना पडला आहे. थंडीच्या दिवसात वृद्ध आईला कमालीचा त्रास होतो. परंतु इलाज नाही, असे रामजी यांनी सांगितले. दररोज मजुरी करून उदरनिर्वाह केला जातो. महागाईच्या दिवसांत उदरनिर्वाह केल्यानंतर पैशाची बचत होत नाही. त्यामुळे स्वतःच्या पैशाने घर कसे बांधावे, असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना