प्रबोधनकारावर उपासमारीची पाळी
By Admin | Updated: May 21, 2016 00:35 IST2016-05-21T00:35:00+5:302016-05-21T00:35:00+5:30
जीवनात प्रत्येकाला छंद असतोच. परंतू समाजसेवा, मनुष्यप्रेम जोपासण्याचा छंद काही निराळाच. नि:स्वार्थपणे अविरत ....

प्रबोधनकारावर उपासमारीची पाळी
समाजसुधारणेचा वसा : भाऊराव भजन, कीर्तनातून साकारतो सृजनशील समाज
पालांदूर : जीवनात प्रत्येकाला छंद असतोच. परंतू समाजसेवा, मनुष्यप्रेम जोपासण्याचा छंद काही निराळाच. नि:स्वार्थपणे अविरत आयुष्याची ४० वर्ष भजन, गायन, कीर्तन करीत राष्ट्रसंताच्या मार्गावर चालण्याचा संदेश देत भाऊराव आता साठीत पोहोचला आहे. वृध्दावस्थेमुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर असल्याने त्यांनी उदरनिर्वाहाकरिता शासनाकडे आस लावली आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील पळसगाव येथील भाऊराव तुळशीराम नागलवाडे हे सामान्यातील सामान्य मानसापर्यंत पोहचत व्यसन, अंधश्रध्दा, हुंडा पध्दती, कौटुंबिक कलह यावर प्रकाश टाकीत समाजसुधारणेसाठी मूलमंत्र दिला. राष्ट्रसंत तुकडोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, तुकाराम महाराज, डॉ. बाबा आमटे, डॉ. प्राकश आमटे यांचे जीवनचरित्र शब्दातून त्यांनी समाजाला ऐकवून मन परिवर्तन केले.
अत्याधुनिक काळात समाज नक्कीच बदललेला दिसतो. सिनेमा, नाटक, मालिका यातून पैसे मोजून प्रबोधन शासन करीत आहे. यांच्याशी पुढे जात बिना मोबदल्याने तर एखादा सामान्य पुरुष जर स्वत:ला पूर्णत: झोकून समाज शिक्षणाचा वसा घेत नसेल तर त्याची किंमत व्हायला हवी.
भाऊराव नागलवाडे स्मितहास्य स्वभावामुळे मानसे आपोआप जुळतात व त्यांनी ठेवलेले विचार व आचार बघून नक्कीच मैत्री होते. जग पैशाच्या मोहात माणसे तोडतो. परंतु भाऊराव बिना पैशाने माणसे जोडून सृजनशील समाजाची सांगड बांधतो.
अत्यल्प शिक्षण गरीबीच्या सावलीत जगणारा भाऊराव सामान्यांच्या जीवनाच्या अविरत भागत घेऊन बसला. या सामान्यातल्या असामान्य मानसाला आयुष्याच्या शेवटी आर्थिक आधाराची नितांत गरज आहे. व ती शासन प्रशासनाने पुरवावी, अशी मागणी प्रबोधनातून समाज घडविणाऱ्या भाऊराव यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)