धान खरेदी बंदमुळे शेकडो धानपोती उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:44+5:30

तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. अस्मानी संकटांशी सामना करीत येथील शेतकरी धानाची मळणी केली. धान विक्रीनंतर लवकर पैसा हाती येईल, असा समज शेतकऱ्यांचा झाला. शेतकऱ्यांनी वाहनी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेकडो क्विंटल धान पोहोचता केला.

 Hundreds of paddy fields open due to paddy purchase closure | धान खरेदी बंदमुळे शेकडो धानपोती उघड्यावर

धान खरेदी बंदमुळे शेकडो धानपोती उघड्यावर

Next
ठळक मुद्देवाहनी केंद्रातील प्रकार : शेतकऱ्यांवर सुल्तानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील वाहनी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेकडो पोती धान पडून आहे. परंतु धान खरेदी केंद्र सुरू करण्याला अजुनपर्यंत परवानगी मिळाली नाही. एकीकडे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले असताना आता सुल्तानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. अस्मानी संकटांशी सामना करीत येथील शेतकरी धानाची मळणी केली. धान विक्रीनंतर लवकर पैसा हाती येईल, असा समज शेतकऱ्यांचा झाला.
शेतकऱ्यांनी वाहनी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेकडो क्विंटल धान पोहोचता केला. खरेदी केंद्राच्या सभोवताल धानाची पोती सध्या ठेवली आहेत. मागील आठ दिवसापासून सदर शेतकरी धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडून आहे.
पावसात धान भिजू नये म्हणून शेतकऱ्यांनी धान पोत्यावर प्लॉस्टिक झाकून ठेवले आहे. धानाच्या पोत्यांवर उंदरांनी ताव मारणे सुरू केले आहे. त्यामुळे धानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. धान चोरीची शक्यता येते नाकारता येत नाही. एकीकडे शेतकरी ओल्या दुष्काळाशी सामना करित आहे तर दुसरीकडे कसेबसे धान वाचवून विक्रीकरीता आणले तरी त्याची खरेदी करायला कुणी वाली दिसत नाही, अशा प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिल्या.

जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता जिल्हा मार्केटिंग अधिकारी परवानगी देतात. शासनाचे आदेश जिल्हा मार्गेटिंग अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. परंतु तांत्रिक अडचण कुठे आली हे समजायला मार्ग नाही. नवनिर्वाचित आमदार तथा खासदारांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकारामुळे स्थानिक शेतकऱ्यांत प्रचंड रोष दिसत आहे.

वाहनी येथील धान खरेदी केंद्रावर शेकडो पोती धान पडून आहे, परंतु मागील आठ दिवसापासून धान खरेदी केंद्र बंद आहे. धानाचे मोठे नुकसान येथे होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
-हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य, तुमसर.

Web Title:  Hundreds of paddy fields open due to paddy purchase closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.