भंडारा जिल्ह्यातील साकोलीत दारू खरेदीसाठी प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:05 PM2020-05-09T14:05:05+5:302020-05-09T14:05:35+5:30

भंडारा: ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दारु विक्रीसाठी शनिवारपासून सशर्त परवागी देताच साकोली येथे वाईन शॉपसमोर सकाळपासून प्रचंड गर्दी उसळी. दारु खरेदीसाठी लांब रांगा लागल्याचे दिसत आहे.

Huge crowd to buy liquor in Sakoli in Bhandara district | भंडारा जिल्ह्यातील साकोलीत दारू खरेदीसाठी प्रचंड गर्दी

भंडारा जिल्ह्यातील साकोलीत दारू खरेदीसाठी प्रचंड गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दारु विक्रीसाठी शनिवारपासून सशर्त परवागी देताच साकोली येथे वाईन शॉपसमोर सकाळपासून प्रचंड गर्दी उसळी. दारु खरेदीसाठी लांब रांगा लागल्याचे दिसत आहे.
लॉकडाऊन घोषित झाल्यापासून जिल्ह्यातील दारू विक्री बंद होती. दरम्यान शासनाने दारू विक्रीस सशर्त परवानगी दिली. त्यानुसार भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून मद्य विक्रीस परवानगी दिली. त्यानुसार साकोली येथे शनिवारी दारू विक्रीस सुरुवात झाली आणि खरेदीसाठी झुंबड उडाली. याठिकाणी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी लाकडी कठडे बांधण्यात आले असून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

 

Web Title: Huge crowd to buy liquor in Sakoli in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.