विशेष रेल्वेच्या नावाखाली किती दिवस लूट करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST2021-07-14T05:00:00+5:302021-07-14T05:00:21+5:30

कोरोनासोबत जीवन जगायचे तंत्र नागरिकांना गवसले असले तरी रेल्वे विभागाकडून अजून किती दिवस लूट सुरू राहील, असा प्रश्न आहे. वाढलेले तिकिटाचे दर सामान्य केव्हा होतील याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. भंडारा रोड रेल्वेस्थानक हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. मुंबई-हावडा मार्गावर जलदगतीच्या रेल्वेने प्रवास करण्याकरिता सामान्य तिकीट विक्री बंद आहे. रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास आरक्षण केल्याशिवाय शक्य नाही. 

How many days will be looted under the name of special train? | विशेष रेल्वेच्या नावाखाली किती दिवस लूट करणार?

विशेष रेल्वेच्या नावाखाली किती दिवस लूट करणार?

ठळक मुद्देप्रवाशांचा सवाल : तिकीट लागतेय दुप्पट अधिक, प्रवाशांना बसतोय आर्थिक भुर्दंड

तथागत मेश्राम
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी :  थबकलेली रेल्वेची चाके धावायला लागली आहेत. पण सर्वसाधारण प्रवाशांना प्रवासास मनाई आहे. विशेष रेल्वे गाड्यांच्या नावावर प्रवास तिकीट दुप्पट असल्याने साधारण प्रवाशांना घाम फुटत आहे. 
कोरोनासोबत जीवन जगायचे तंत्र नागरिकांना गवसले असले तरी रेल्वे विभागाकडून अजून किती दिवस लूट सुरू राहील, असा प्रश्न आहे. वाढलेले तिकिटाचे दर सामान्य केव्हा होतील याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. भंडारा रोड रेल्वेस्थानक हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. मुंबई-हावडा मार्गावर जलदगतीच्या रेल्वेने प्रवास करण्याकरिता सामान्य तिकीट विक्री बंद आहे. रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास आरक्षण केल्याशिवाय शक्य नाही. 

प्रवासी म्हणतात...

रेल्वे प्रवास सुरक्षित व आर्थिक बाबतीत परवडणारा आहे. प्रवास करण्याकरिता असलेले निर्बंध हे नागरिकांच्या हिताचे आहेत. कठीण काळ बघता सरकारने प्रवासबंदीच्या नियमात शिथिलता आणावी. सामान्य प्रवासाकरिता प्रवास निर्बंध विरहित करून जनजीवनाची घडी रुळावर येण्यास मदत करावी.
-गणेश हिंगे, सामाजिक कार्यकर्ते 

सध्याच्या स्थितीत रेल्वे आकारत असलेले प्रवासी भाडे दुपटीपेक्षा जास्त आहे. तिरोडा तालुक्यातील एका खेडेगावातून वरठी सॅनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामावर येतो. पुर्वी लोकसाठी दहा रुपये द्यावे लागायचे. आता ३० रुपये मोजावे लागतात. यामुळे आमचे बजेट कोलमडले आहे.
-मानसिंग हिरापुरे, प्रवासी.

तिकीट किमती दुपटीपेक्षा जास्त
मुंबई-हावडा मार्गावर अप-डाऊन धावणाऱ्या ३४ रेल्वे गाड्या सुरू आहेत. यात ३ साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे. गोंदिया-इतवारी मार्गावर एकमेव सर्वसाधारण लोकल गाडी धावते. लोकल गाडीने प्रवास करण्यास निर्बंध नाहीत. पण कार्यालयीन किंवा व्यावसायिक दृष्टीने प्रवास करण्यास ती रेल्वे गाडी सोयीची नाही. 

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी
 रेल्वे विभागाकडून आरक्षणाच्या नावावर होणारी पिळवणूक बंद करण्याची मागणी येथील व्यापारी सुधीर बागडे यांनी केली आहे. सुधीर बागडे यांचे जनरल दुकान असल्याने त्यांना आठवड्यातून दोन-तीन वेळा नागपूर व गोंदिया येथे खरेदीला जावे लागते. कधी कधी जाणे ठरवून नसते.
 ग्राहकांच्या मागणीनुसार धावत-पळत खरेदीला जावे लागते. पण आरक्षणाचे निर्बंध असल्याने व्यवसायात नुकसानाला सामोरे जावे लागते. कोविडमुळे व्यवसाय डबघाईस आले असताना एखादी संधी मिळाली तरी रेल्वेच्या आरक्षण निर्बंधाने लाभ घेता येत नाही.

 

Web Title: How many days will be looted under the name of special train?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे