शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यांच्या दराने बिघडले गृहीणींचे बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या प्रारंभी पिकांसह भाजीपाल्यांचीही लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी मुबलक नव्हती. परिणामी भाजीपाल्यांचे दरही आवाक्यात होते. मात्र गत तीन आठवड्यांपासून ऊन-सावलीच्या खेळासह अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने भाजीपाल्याची वाढ खुंटली.

ठळक मुद्देलॉकडाऊनचाही फटका : ग्राहकांच्या खिशाला कात्री, मध्यप्रदेश, छत्तीसगढमधून भाज्यांची आवक घटली

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्ग आणि वातावरण बदलाचा सरळसरळ फटका भाजीपाला पिकांवर बसला आहे. सर्वच प्रकारचा भाजीपाला महागला असून गृहीणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे. लॉकडाऊन काळात अनेकांची आर्थिक कोंडी झाली असताना भाजीपाल्यांचे दर कडाडल्याने समस्येत भर पडली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या प्रारंभी पिकांसह भाजीपाल्यांचीही लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी मुबलक नव्हती. परिणामी भाजीपाल्यांचे दरही आवाक्यात होते. मात्र गत तीन आठवड्यांपासून ऊन-सावलीच्या खेळासह अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने भाजीपाल्याची वाढ खुंटली. त्यातच लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील शेतमालाच्या आयात-निर्यातीवर विपरीत परिणाम जाणवला.सध्या बाजारात कुठल्याही भाजीपाल्याची टंचाई नसली तरी दरवाढीने जनसामान्यांचे बजेट कोसळले आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून भाज्यांची आवक कमी झाल्याचेही दिसून येते. येथील थोक सब्जी मंडीत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवकही वाढल्याचे दिसून येते. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाही बसला आहे. कोरोनासंसर्ग, वातावरणातील बदल व मागणीच्या कारणामुळे भाज्यांचे दर वाढले आहे.सणासुदीचा काळजीवती म्हणजेच दीप पुजनापासून सणाला प्रारंभ होत असतो. विविध सणांच्या माध्यमातून पदार्थ बनविण्याची तयारीही जोमात असते. अशावेळी भाजीपाल्यांचीही मागणी वाढत असते. सणासुदीचा काळ सुरू झालेला असून त्याला महगाईची झळ निश्चितपणे बसणार आहे, यात शंका नाही. वाढलेले दर कमी होणार काय? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.या कारणांमुळे भाज्यांचे भाव वाढलेतीन महिन्यांपूर्वी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊननंतर जिल्हाबाहेरील भाजीपाला जिल्ह्यात येण्यास अडचण निर्माण झाली. कोरोना संसर्गाचा सरळ सरळ फटकाही भाजीपाला उत्पादकांनाही बसला. थोड्या काळासाठी रहदारीचा प्रश्नही बिकट बनला.यावर्षी पावसाने सातत्यपणा दाखविला. प्रत्येकच महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाला पिकांवर सक्रांत आली. काही ठिकाणी अपवाद वगळल्यास भाज्यांचा पुरवठा नियमित होता. परिणामी दोन महिन्यांपूर्वी दरवाढ दिसून आली नाही.कोरोना संकटात भाजीपाला बाजारपेठ बंद नसली तरी नागरिकांनी हव्या त्या प्रमाणात भाजीपाल्यांची मागणी केली नाही. हळूहळू त्यात वाढ दिसून आली. सध्या वातावरण बदलाचा फटका दरवाढील कारणीभूत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्या