The house collapsed at a Sukli | सुकळी येथे घर कोसळले
सुकळी येथे घर कोसळले

ठळक मुद्देसात जण थोडक्यात बचावले : जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सुकळी येथील एक घर अचानक कोसळण्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने घरातील सातही जण बाहेर असल्याने थोडक्यात बचावले. रात्रीच्यावेळी ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. घरातील जीवनावश्यक वस्तुंचे मोठे नुकसान झाले.
सुकळी (नकुल) येथे वैनगंगा नदीच्या तीरावर विनायक रुपचंद उके यांचे घर आहे. त्यांचे सात जणांचे कुटुंब या घरात वास्तव्याला आहे. मात्र गत काही महिन्यांपासून घर जीर्ण झाले होते. जीव मुठीत घेवून कुटुंब राहत होते. घरकुल योजनेची मागणीही केली होती. परंतु घरकुल मिळाले नाही. त्यामुळे या घरात राहण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. दरम्यान रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास जीर्ण झालेले घर अचानक कोसळले. सुदैवाने सकाळ असल्याने संपुर्ण कुटुंब बाहेर होते. अन्यथा मोठा अनर्थ झाला असतो. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, उमेश तुरकर, डॉ. जितेंद्र तुरकर, महेश रहांगडाले, सरपंच रेशमा रहांगडाले, पोलीस पाटील चंद्रभोज रहांगडाले, सचिव टिकले, सुशिला रहांगडाले, कोतवाल घटारे, चुन्नीलाल रहांगडाले यांनी भेट देवून घराची पाहणी केली.

Web Title: The house collapsed at a Sukli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.