गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST2021-09-17T04:41:50+5:302021-09-17T04:41:50+5:30
मोहाडी : येथील भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सव परमात्मा एक सभागृहात ...

गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार
मोहाडी : येथील भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सव परमात्मा एक सभागृहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर करून माजी संचालक, गुणवंत विद्यार्थी सत्कार, सेवानिवृत्त सभासद सत्कार यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय नानाजी माटे व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून खासदार सुनील मेंढे यांनी सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी आमदार राजू कारेमोरे होते. अतिथी म्हणून माजी आमदार चरण वाघमारे माजी, आमदार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनेंद्र तुरकर, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी शांताराम चाफले, नारायण तितीरमारे, डाॅ. राहुल ठवरे, संस्था अध्यक्ष उमेश चिंधालोरे यांची मंचावर उपस्थिती होती. १३ जुलै १९७१ स्व. ना. ल. माटे व त्यांच्या सात सहकाऱ्यांनी भंडारा गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची मोहाडी येथे स्थापन केली. त्या संस्थेला ५० वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे मोहाडी येथे सुवर्ण महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त स्मिता गालफाडे यांचा यावेळी सत्कार केला गेला. तसेच सभासदांनी लेखणीतून साकार केलेली सहकार समृद्धी नावाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. नागपूरच्या वेल ट्रिट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ११ सभासदांनी रक्तदान केले. संस्थेचे कार्यवाह व प्राचार्य ओमप्रकाश गायधने प्रास्ताविकातून संस्थेने केलेल्या भरभराटीची व प्रगतीची माहिती दिली. संचालन संदीप वहिले, मुकुंद ठवकर यांनी केले. संस्था अध्यक्ष उमेश चिंधालोरे यांनी आभार व्यक्त केले. कोविड-१९ नियम पालन व सभासद संख्या लक्षात घेता पहिल्यांदाच भंडारा/गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात आली.