बालरक्षक व जिजाऊंच्या लेकीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:42+5:302021-01-15T04:29:42+5:30

राज्यांतून १२ शिक्षिकांचा समावेश तुमसर : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रात शाळाबाह्य, वंचित, शोषित, दुर्बल घटकांकरिता बालरक्षक चळवळ ...

Honoring the child guard and Jijau's Leki | बालरक्षक व जिजाऊंच्या लेकीचा सन्मान

बालरक्षक व जिजाऊंच्या लेकीचा सन्मान

Next

राज्यांतून १२ शिक्षिकांचा समावेश

तुमसर : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रात शाळाबाह्य, वंचित, शोषित, दुर्बल घटकांकरिता बालरक्षक चळवळ सुरू झाली. या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला शिक्षिका सहभागी झाल्या. त्यांच्या कार्याची दखल घेत बालरक्षक महाराष्ट्र टीमच्या वतीने राज्यातील बारा शिक्षिकांचा जिजाऊंच्या लेकी म्हणून राजमाता जिजाऊ जयंतीदिनी सन्मान करण्यात आला. त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातून मंजूषा बोदेले, नंदेश्वर पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव, यांचा बालरक्षक तसेच जिजाऊची लेक म्हणून सन्मान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारते वेळी मंजूषा नंदेश्वर यांनी बालरक्षक म्हणून कोणते कार्य केले, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता बालरक्षकांची भूमिका काय तसेच मुलांना टिकवून ठेवण्यासाठीचे विविध उपक्रम हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. डाॅ. कमलादेवी आवटे उपसंचालक एससीईआरटी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन योगिनी वैदू व दीपाली सबसगी यांनी तर प्रास्ताविक योगिनी वैदू शिक्षिका (रायगड) यांनी तर आभारप्रदर्शन दीपाली सबसगी यांनी केले. कार्यक्रमाकरिता बालरक्षक टीम महाराष्ट्र यांनी सहकार्य केले.

Web Title: Honoring the child guard and Jijau's Leki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.