शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

जातीपातीचा भ्रम सोडून गुणीजणांचा सन्मान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:01 IST

मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे ग्रामवासीयांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक रंगमंच गांधी चौक पटांगणावर २७ जानेवारी पासून श्रीमद् भागवत संगितमय शिवपुराण व ग्रामगीता प्रणित ज्ञान यज्ञ सप्ताह सुरु आहे. या सप्ताहानिमित्त दररोज धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. अशाच एका प्रवचन कार्यक्रमात भाविकांना संबोधित करताना बावणे महाराज बोलत होते.

ठळक मुद्देसंडे अँकर । हेमदास बावणे महाराज, जांभोरा येथे श्रीमद् भागवत शिवपुराण व ग्रामगीता सप्ताह

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : अस्ताव्यस्त तारांबळ, उधळपट्टी आणि धावपळ! यासी म्हणावे कार्य अमंगल, खर्च निष्फळ पैशाचा! लग्नाकरिता कर्ज करावे, जन्मभरी व्याज भरीत जावे! लग्नासाठी कफल्लक व्हावे, कोण्या देवे सांगितले! वेळ पैसा आणि श्रम वाचवावेत करोनी नेम! गुणांस द्यावे महत्व परम्, जाती-धन-भ्रम सोडोनी! या ग्रामगीतेच्या वचनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी माणुसकीचा धर्म शिकविला आहे. त्यामुळे ग्रामवासीयांनी जाती व धनसंपदेचा भ्रम सोडून गुणीजनांच्या सन्मानाला महत्व दिले पाहिजे, असे प्रवचन पिंपळगाव (निपानी) येथील हरिभक्त पारायण हेमदास बावणे महाराज यांनी केले.
मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे ग्रामवासीयांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक रंगमंच गांधी चौक पटांगणावर २७ जानेवारी पासून श्रीमद् भागवत संगितमय शिवपुराण व ग्रामगीता प्रणित ज्ञान यज्ञ सप्ताह सुरु आहे. या सप्ताहानिमित्त दररोज धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. अशाच एका प्रवचन कार्यक्रमात भाविकांना संबोधित करताना बावणे महाराज बोलत होते.
भागवत सप्ताहानिमित्त जांभोरा गावाला सजविण्यात आले. घरोघरी रांगोळ्या घातल्या जावून प्रभातफेरी, सामुदायिक ध्यान, कथा, प्रवचन, सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ आदी कार्यक्रामची रेलचेल आहे. प्रवचनाला महिलांबरोबर पुरुषांची लक्षणीय उपस्थित असते. या सप्ताहाचा समारोप २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

प्रवचनाला मिळालेला सहभाग
प्रवचनासाठी बावणे महाराज यांना तालसुराची साथ गायक प्रभुदास दिवटे, दुधराम भोयर बल्लापूर, आरगन वादक राजू पेंदारेकर आवळगाव, हारमोनियम एक्टोपॅड राधेश्याम दोनारकर, तबलावादक विलास दिवटे बल्लारपूर, नाल वादक निमणभाऊ सलामे खांबाडा यांची साथ मिळाली. तर हरिपाठासाठी हभप सोनवाने महाराज बारव्हा यांची साथ लाभत आहे. मिळालेला सहभाग भाविकांना मंत्रमुग्ध करीत आहे.

आज विवाह सोहळा व समारोप
मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे ग्रामवासीयांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक रंगमंच गांधी चौक पटांगणावर सप्ताहाचा समारोप २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यापूर्वी दुपारी गोपालकाला कीर्तन व महाप्रसादाचे वितरण होईल. त्यानंतर दुपारी ३.२५ वाजता विवाह सोहळा पार पडेल. या विवाह सोहळ्यात दोन जोडपी विवाह बंधनात अडकणार आहेत.