आरोग्य केंद्र इमारत बांधकामाला घरघर
By Admin | Updated: July 28, 2015 01:07 IST2015-07-28T01:07:50+5:302015-07-28T01:07:50+5:30
आयुर्वेदिक दवाखान्याच्या खोलीत आरोग्य सुविधा उपलब्ध करणाऱ्या चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत

आरोग्य केंद्र इमारत बांधकामाला घरघर
निधीचा थांगपत्ता नाही : जागेचा गुंता कायम, भंगाराचे साहित्य अस्तव्यस्त
रंजित चिंचखेडे ल्ल चुल्हाड
आयुर्वेदिक दवाखान्याच्या खोलीत आरोग्य सुविधा उपलब्ध करणाऱ्या चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामाचा गुंता कायम आहे.
सिहोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे चुल्हाड येथे स्थानांतरीत करण्यात आले. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार आणि रुग्णांना सेवा आयुर्वेदिक दवाखान्याच्या खोलीत दिली जात आहे. या खोल्या सेवा देताना अपुऱ्या ठरत आहेत. यामुळे रुग्णांची तपासणी करताना अडचण निर्माण होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कक्षही वऱ्हांड्यात ठेवण्यात आले आहे. ओपीडीची पावती दारात दिली जात आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत बहुतांश पूरग्रस्त गावे आहोत. रुग्णांना सुविधाअभावी तात्काळ सेवा दिली जात नाही. प्राथमिक स्तरावर आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण रुग्णात नाराजीचा सूर आहे.
या आरोग्य केंद्राचे अर्धेअधिक साहित्य नजीकच्या उपकेंद्रात ठेवण्यात आले आहे. गरोदर मातांची तपासणी कक्ष या साहित्यांनी फुल्ल झाले आहेत. अनेक साहित्य इमारतीच्या आजूबाजूला ठेवण्यात आली आहे. या साहित्यांची सुरक्षा करणारी यंत्रणा या आरोग्य केंद्रात नाही. इमारत बांधकामासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आली होती. मैदानाच्या जागेत आरोग्य केंद्र इमारत तथा कर्मचाऱ्यांची वसाहत असे नियोजन तयार करण्यात आले होते.
मे महिन्यात भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपला. बपेरा आणि चुल्हाड या दोन जिल्हा परिषद क्षेत्रातील गावे आरोग्य केंद्राला सलग्नीत आहेत.
चुल्हाडचा आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र अंतर्गत असणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इमारत बांधकाम व मंजुरीची प्रमुख समस्या असल्याने सोडविण्याचा प्रयत्न राहील.
- प्रतीक्षा कटरे,
जि.प. सदस्या चुल्हाड