विधान परिषद निवडणुकीचे मतदान होणार हायटेक

By Admin | Updated: November 19, 2016 00:28 IST2016-11-19T00:28:48+5:302016-11-19T00:28:48+5:30

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवारला मतदान होत आहे. भंडारा-गोंदियातील चारही मतदान केंद्र वेबकास्टद्वारे जोडण्यात आले आहे.

Hitek will be going to polls in Vidhan Parishad elections | विधान परिषद निवडणुकीचे मतदान होणार हायटेक

विधान परिषद निवडणुकीचे मतदान होणार हायटेक

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : चारही मतदान केंद्र वेबकास्टद्वारे जोडले
भंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवारला मतदान होत आहे. भंडारा-गोंदियातील चारही मतदान केंद्र वेबकास्टद्वारे जोडण्यात आले आहे. हे मतदान नागरिकांना भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या ६६६.ुँंल्लंि१ं.ॅङ्म५.्रल्ल व ६६६.ॅङ्मल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर लाईव्ह उपलब्ध करून देण्याचा अभिनव प्रयोग जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे. निवडणूक प्रक्रीयेतील पारदर्शकता जपण्यासाठी विधान परिषद निवडणुकीचे मतदान हायटेक करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा हा प्रयोग अनोखा व अभिनव असाच आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या ६६६.ुँंल्लंि१ं.ॅङ्म५.्रल्ल व ६६६.ॅङ्मल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया यु ट्युबवर लाईव्ह पाहता येणार आहे. जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर होमपेजच्या उजव्या बाजूला चालू घडामोडी असा मथळा असलेली चौकट आहे. त्या चौकटीत टछउ एछएउळकडठ 2016 छकश्ए हएइ ही लिंक देण्यात आली आहे.
या लिंकवर क्लिक केल्यास भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीच्या चारही मतदान केंद्राची यादी दिसेल. ज्या मतदान केंद्राचे मतदान लाईव्ह पहायचे आहे. त्या मतदान केंद्रास क्लिक केल्यास मतदानाची थेट प्रक्रिया पाहावयास मिळणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याची जिल्ह्यात पहिलीच वेळ आहे.
या निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली, गोंदिया जिल्ह्यात तहसिल कार्यालय सडक अर्जुनी व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया असे चार मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत उपरोक्त मतदान केंद्रावर मतदान करण्यात येईल. मतमोजणी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून करण्यात येईल. मतपेटया ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे स्ट्राँगरूम निश्चित करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Hitek will be going to polls in Vidhan Parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.