तुमसरमध्ये पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:19 IST2019-06-26T01:18:34+5:302019-06-26T01:19:27+5:30
पेट्रोलपंपावर शिवीगाळ करणाºया तरूणाला हटकल्यावरून दोन कर्मचाऱ्यांना चौघांनी मारहाण केल्याची घटना येथील बसस्थानकाजवळील एका पेट्रोलपंपावर मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. मारहाण करणारे सीसीटिव्हीत कैद झाले आहे.

तुमसरमध्ये पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पेट्रोलपंपावर शिवीगाळ करणाºया तरूणाला हटकल्यावरून दोन कर्मचाऱ्यांना चौघांनी मारहाण केल्याची घटना येथील बसस्थानकाजवळील एका पेट्रोलपंपावर मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. मारहाण करणारे सीसीटिव्हीत कैद झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ तुमसर व मोहाडी तालुक्यातील पेट्रोलपंप चालकांनी बंद पाळला.
मनिष मेश्राम, शिशुपाल पिलगर, आकाश रामटेके, मोनू घरडे सर्व रा. हसारा तालुका तुमसर अशी मारहाण करणाºया तरूणांची नावे आहे. तुमसर बसस्थानकाजवळ अभिषेक कारेमोरे यांच्या मालकीचे पेट्रोलपंप आहे. दुपारी ३ वाजता दोन दुचाकीवरून चार तरूण पेट्रोल भरण्यासाठी आले. ते एकमेकांना अश्लिल शिवीगाळ करीत होते. त्यावरून तेथील कर्मचाºयांनी त्यांना हटकले. मात्र या तरूणांनी नरेश ईस्तारू वंजारी (२५) रा. खरबी आणि सुदर्शन देवराम मेश्राम (५०) रा. पचारा या दोन कर्मचाºयांना मारहाण सुरू केली. तसेच पेट्रोल पंपावरील साहित्याची नासधुस केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली. आरोपीच्या अटकेसाठी तुमसर, मोहाडी तालुक्यातील सर्व पेट्रोलपंप चालकांनी कडकडीत बंद पाडला. तुमसर पोलिसात तक्रार देण्यात आली