जिल्ह्यातील महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST2021-02-22T05:00:00+5:302021-02-22T05:00:52+5:30
भंडारा ते मोहाडी पर्यंतच्या रस्त्यावर असंख्य लहानमोठ्या खड्ड्यांनी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. साकोली ते तुमसर या दोन तालुक्यांना जोडणारा तुमसर ते साकोली महामार्ग विस्तारीकरणाचे पुढेही असेच घडले. कुठे तांत्रिक तर कुठे निधीचा वानवा जाणवत आहे. याकडे सार्वजिनक बांधकाम विभाग व राष्ट्रीय हायवे प्राधिकरणाने लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम रखडले
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अवधीपूर्वी बांधकाम न झालेल्या महामार्ग विस्तारीकरणाचे घोडे अद्यापही रखडले आहेत. त्यातच कोरोनाचा फटका या महामार्ग बांधकामाला अजूनच विलंब लावीत आहेत. या रखडलेल्या कामांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम जाणवत आहे.
भंडारा जिल्हयातील कारधा ते निलज मार्ग, तुमसर ते साकोली मार्ग व भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे प्रस्तावित आहे तर कुठे बांधकाम थंडबस्त्यात आहे. भंडारा ते तुमसर या राज्यमार्गाच्या (नवीननुसार महामार्ग) विस्तारीकरणाचे घोडे तांत्रिक बाबींमुळे रखडले आहे.
भंडारा ते मोहाडी पर्यंतच्या रस्त्यावर असंख्य लहानमोठ्या खड्ड्यांनी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. साकोली ते तुमसर या दोन तालुक्यांना जोडणारा तुमसर ते साकोली महामार्ग विस्तारीकरणाचे पुढेही असेच घडले. कुठे तांत्रिक तर कुठे निधीचा वानवा जाणवत आहे. याकडे सार्वजिनक बांधकाम विभाग व राष्ट्रीय हायवे प्राधिकरणाने लक्ष देण्याची गरज आहे.
नागरिकांचा जीव धोक्यात
दुसरीकडे निलज ते कारधा या महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम गत दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातांमुळे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. तुमसर तालुक्यातील महामार्गाचे काम काही ठिकाणी पूर्णत्वास येत असले तरी उड्डाणपुलांचे काम अजूनही सुरूच आहे.