महामार्गावरील दर्शनी फलक, रेलिंग भुईसपाट
By Admin | Updated: June 16, 2014 23:22 IST2014-06-16T23:22:36+5:302014-06-16T23:22:36+5:30
ठाणा-खरबी (नाका) येथील निर्माणाधिन नवीन राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे व भौगोलिक परिस्थितीच्या विरुद्ध नाली बांधकाम केल्याने स्थानिक ग्रामस्थांना कमालीचा त्रास सहन

महामार्गावरील दर्शनी फलक, रेलिंग भुईसपाट
जवाहरनगर : ठाणा-खरबी (नाका) येथील निर्माणाधिन नवीन राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे व भौगोलिक परिस्थितीच्या विरुद्ध नाली बांधकाम केल्याने स्थानिक ग्रामस्थांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
मुजबी ते पारडी (नाका) दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम ९० टक्के आटोपले आहे. या दरम्यान खरबी (नाका) येथे मात्र अद्याप सर्व्हीस रोड तयार करण्यात आलेले नाही. बहुतांश रस्ता रुंदीकरण बाधीत घरांना अवार्ड शासनातर्फे प्राप्त झालेले आहे. येथील भौगोलिक परिस्थितीनुसार संपूर्ण गावाचे पाणी हे गावतलावात जात होता. मात्र नव्याने ग्रामपंचायत खरबी व विकास हायस्कूल दरम्यान नाली ही दहा ते पंधरा फुट खोल बांधण्यात आली. विकास हायस्कूल पुढे नाली ही दोन फुट खोल आहे. या परिस्थितीत सांडपाणी वाहून कसा जाणार हा येथे प्रश्न पडला आहे. परिणामी नालीत संपूर्ण गावातील पाणी साचून शाळेत, लहान बालगोपालांच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायतमध्ये शिरकाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठाणा पेट्रोलपंप येथील दोन्ही बाजूकडील नाली बांधकाम योग्य दिशा न दाखविता विस्कळीत स्वरुपात भौगोलिक परिस्थितीच्या विरुद्ध नाल्याला उतार करण्यात आले आहे. यापूर्वी दोन्ही बाजूंनी गावातील सांडपाणी व शेतकऱ्यांकडील कालव्याचे पाणी जुना ठाणा मार्गाने स्मशानभूमी व नवीन शहापूर पुलाकडे वाहून जात होता.
परंतु आता नाल्यांची दिशा याउलट करण्यात आली. गावाबाहेरचे पाणी गावात नाल्याच्या उतारवरुन साचवित येत आहे. टी पॉर्इंटवरील जुना बुद्ध विहार व पेट्रोलपंप दरम्यान नाली जमीनदोस्त झालेली आहे.
या ठिकाणाहून पावसाचे व कालव्याचे पाणी रस्त्यावरुन नेहमी वाहत जातो. परिणामी रहदारी करणाऱ्या ग्रामस्थांना व या स्थळी बसस्थानक प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. फुलमोगरा ते मुजबी पुलादरम्यान चुरीचे काम आटोपले. मात्र पंधरा दिवसांपासून चुरीचे ढिगार रस्त्यावर पडलेले आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
उल्लेखनीय बाब म्हणजे अशाच ढिगाऱ्यामुळे लोकमत समाचारचे संगणक आॅपरेटरचे अशोकनगर दरम्यान अपघाती मृत्यू झाला होता. ठाणा-खरबी येथील समस्येचे निराकरण करण्यासाठी शासन-प्रशासनास लेखी पत्र व्यवहार करण्यात आले. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
जीव गमावल्यावर शासनास जाग येणार काय? ठाणा-खरबी येथे राष्ट्रीय प्राधिकरण नागपूरचे सतीश जानवी, तहसीलदार शिशांत बनसोडे, जे.एम.सी.चे वरिष्ठ व्यवस्थापक सविंद्र, दिलीप बिलकॉमचे बांधकाम अधिकारी सतीश सिंग यांनी भेट दिले. ठाणा व खरबी (नाका) येथील नाली बांधकाम भौगोलिक परिस्थितीच्या विरुद्ध तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तात्काळ नव्याने आराखडे तयार करुन पावसाळ्यापूर्वी बांधकाम करण्याचे निर्देश दिले. मात्र माशी कुठे शिंकली कोण जाणे, याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)