शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सट्ट्यातील गुंतवणुकीने गाठला उच्चांक

By admin | Updated: November 3, 2014 23:19 IST

आकड्यांचा खेळ अन् पैशांचा पाऊस असे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र सट्ट्यात पैसा गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढत चालली आहे. लाखांदूर तालुक्यात सट्ट्यातील आर्थिक

लाखांदूर : आकड्यांचा खेळ अन् पैशांचा पाऊस असे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र सट्ट्यात पैसा गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढत चालली आहे. लाखांदूर तालुक्यात सट्ट्यातील आर्थिक गुंतवणुकीने उच्चांक वाढविला आहे. याकडे मात्र जिल्हा पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे या सट्ट्याच्या गुंतवणुकीत मोठ्यांसह लहान्यांनीही हजेरी लावली आहे. शिक्षण घेण्याच्या वयात सट्ट्याचा शुभांक शोधण्याचे कार्य विद्यार्थीगण करीत आहेत. तसेच युवक वर्गाचा या व्यवसायात कल वाढत आहे. बँकेत सही चुकली म्हणून खात्यातून पैसे काढण्यात अडचण येत असताना केवळ सट्ट्याच्या या व्यवसायात लहानशा चिट्ठीवर निकाल ठेवून लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. लाखांदूर तालुक्यात हा प्रकार बिनबोभाटपणे व तितकाच गुंतागुंतीचा झाला आहे. तालुक्यात सट्टा व्यवसायाचे चांगले नेटवर्क आहे. यात लाखांदुरातील कुणाकुणाची दररोज लक्षावधींची कमाई होत आहे. बेकायदेशीर तितकाच विश्वास ठेवणारा हा व्यवसाय महिन्याकाठी लाखोंची उलाढाल करणारा आहे. संपूर्ण तालुक्यात सट्टा व्यवसाय चालत असून लाखांतील एका दुकानदार हा व्यवसाय बिनदिक्कतपणे चालवित आहे. दिवसा अमुक तर रात्री दुसऱ्याच नावाने चार आकड्यांचा खेळ खेळला जातो. सर्वत्र नगदी व्यवहार असल्याने व्यवसाय चालविणाऱ्याला कुठलीही झळ बसत नाही. तर दुसरीकडे असंख्य कुटुंब दारिद्र्याच्या खाईत लोटत आहेत.सट्ट्याचा आकडा न फसल्यामुळे दारुच्या आहारी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ३ ते १० टक्के कमीशनवर एजंट असल्याने तरुणांचा जत्था या व्यवसायात हिरीरीने भाग घेत आहेत. बारव्हा, तई, चिचोली, पारडी, बोथली, लाखांदूर, या ठिकाणी जवळपास पंधरा एजंट आहेत. एकट्या लाखांदूर शहरात आठ एजंट आहेत. पंचायत समिती परिसर, शिवाजी चौक, बाजार समिती, किन्हाळा, डोकेसरांडी, बसस्थानक, पिंपळगाव कोहळी, चिचगाव आदी ठिकाणी हे एजंट आहेत. या सर्वांची संख्या २३ च्या घरात आहे. (तालुका प्रतिनिधी)