शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांना मदत द्या

By admin | Updated: March 5, 2016 00:34 IST

मागील चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात झालेल्या वादळी पाऊस झाला. यात कापणीयोग्य तूर, चना, लाखोरी आदी रबी पिके घरी नेण्याची वेळ आली असताना निसर्गाने तोंडचा घास पळविला.

राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : मदत न दिल्यास आंदोलन करूभंडारा : मागील चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात झालेल्या वादळी पाऊस झाला. यात कापणीयोग्य तूर, चना, लाखोरी आदी रबी पिके घरी नेण्याची वेळ आली असताना निसर्गाने तोंडचा घास पळविला. आधीच कर्जात असलेल्या शेतकऱ्यांचे निसर्गाने कंबरडे मोडले. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी केली.यावेळी ते म्हणाले, धान पिकांचे ३३ टक्के नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल, असे राज्य शासनाने घोषित केले होते. पंरतु भंडारा जिल्ह्यात ६० ते ६२ पैसेवारी जाहीर केल्यामुळे ही गाव ३३ टक्के निकषात बसत असूनही अद्याप एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची ४० हजार रूपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्यात यावी, धानाची आधारभूत केंद्रात विक्री झाल्यानंतर चार दिवसाच्या आत धानाचे चुकारे दिले जातील, असे सांगितले होते. परंतु एकाही ठिकाणी चार दिवसात पैसे देण्यात आले नाही. ते चुकारे तातडीने देण्यात यावे, हिवाळी अधिवेशनात प्रति क्विंटल २०० रूपये जाहीर केलेला बोनस देण्यात यावा, पावसामुळे विटभट्टीचे झालेले नुकसान पंचनामे करून देण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती शुभांगी रहांगडाले, विठ्ठल कहालकर, भगीरथ धोटे, गुणवंत काळबांडे उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)