मुख्याध्यापकांनी देयके सादर करावीत
By Admin | Updated: July 12, 2014 00:54 IST2014-07-12T00:54:29+5:302014-07-12T00:54:29+5:30
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचे सन २०१४-१५ ची देयके मुख्याध्यापकांनी विहीत नमुन्यात ...

मुख्याध्यापकांनी देयके सादर करावीत
भंडारा : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचे सन २०१४-१५ ची देयके मुख्याध्यापकांनी विहीत नमुन्यात गट शिक्षणाधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी घेऊन तीन प्रतीत पंचायत समितीमध्ये देयके सादर करावी.
समाजकल्याण विभागामार्फत इयत्ता ५ ते १० वी मधील मुलींनी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना, ९ ते १० वीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती, अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मान्यताप्राप्त विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित शाळेतील बी.पी.एल. शुल्क देणे इत्यादी योजना राबविण्यात येतात. सदर योजनांची शिष्यवृती देयके सादर करण्याबाबतचे पंचायत समिती निहाय वेळापत्रक असे आहे.
तुमसर ५ ते ८ आॅगस्ट, मोहाडी १२ ते १४ आॅगक्ट, पवनी १९ ते २२ आॅगस्ट, लाखांदूर २५ ते २८ आॅगस्ट, साकोली २ ते ५ सप्टेंबर, लाखनी ८ ते १९ सप्टेंबर, भंडारा १५ ते ३० सप्टेंबर पर्यंत सादर करावे, असे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी रामटेके यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)