दुसऱ्या दिवशी सापडला हर्षलचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:15 IST2018-08-26T23:15:11+5:302018-08-26T23:15:29+5:30

मित्रांसोबत नदीवर पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. कालपासून त्याचा शोध सुरू होता. रविवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान हर्षल विठोले याचा मृतदेह सापडला.

Harshal's body found next day | दुसऱ्या दिवशी सापडला हर्षलचा मृतदेह

दुसऱ्या दिवशी सापडला हर्षलचा मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : मित्रांसोबत नदीवर पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. कालपासून त्याचा शोध सुरू होता. रविवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान हर्षल विठोले याचा मृतदेह सापडला.
सुभाष वार्ड वरठी येथील सुमेध ठाकूर (१३), देवेंद्र गोमासे (१५) व हर्षल विठोले (११) सकाळी नजीकच्या खोडगाव येथील नदीत पोहायला गेले होते. नदी पात्रात जाताना तिघांनी कपडे काढून नदीत पोहण्याची तयारी केली. हर्षल वेगाने पाण्यात उतरला. नदीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज चुकल्याने तो वाहुन गेला. त्याच्या मागोमाग इतर दोन मित्र पाण्याच्या प्रवाहात जाणार एवढ्यात नदीच्या काठावर असलेल्या लोकांनी आरडाओरड केली. देवेंद्र गोमासे हा सुद्धा पाण्याच्या दिशेने वाहून जाण्याच्या स्थितीत असताना त्याला नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढले. यात दोघांचा जीव वाचला असून हर्षल पाण्यात बुडाला. त्याचे मृतदेह शोधण्याचा काम सुरू असून सायंकाळ पर्यंत शोध लागला नव्हता. दीर्घ शोधमोहीम नंतर घटनास्थळापासून १ किमी अंतरावर नदी पत्रात मृतदेह मिळाला. घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक एस बी ताजने ताफ्यासह घटना स्थळावर हजर झाले होते. मृतदेह शोधण्यासाठी दोन चमू तयार करून शोधाशोध सुरू होती. रात्री शोधमोहीम थांबण्यात आली होती. रविवार सकाळपासून पुन: मोहीम सुरू करण्यात आली.

Web Title: Harshal's body found next day