शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Bhandara Crime: भंडाऱ्यात महिलांवरील छळ २७५% ने वाढला ! २५ टक्के प्रकरणांत पैशासाठी होतो महिलांचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:04 IST

Bhandara : लग्न म्हणजे दोन जिवांचा आणि दोन कुटुंबातील मनोमिलनाचा, परंतु लहान सहान कारणांमधून दाम्पत्यांमध्ये संशयकल्लोळ माजत असतो. त्यातच वराकडील मंडळी हव्यासापोटी विवाहितेचा छळ करत असतील तर अशावेळी ते प्रकरण वेगळीच कलाटणी घेते.

भंडारा : वैष्णवी हगवणे यांचे मृत्यू प्रकरण राज्यात गाजत आहे. तपासाअंती बरेचसे मुद्दे समोर येत असल्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना कोणत्या पातळीला जाऊ शकतात याचा ऊहापोह सुरू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील गत पाच महिन्यांत तक्रारींच्या आकडेवारीवर नजर घातल्यास जवळपास २७५ टक्के प्रकरणे ही पैशासाठी छळ केल्याच्या आहेत.

भंडारा राज्याच्या पूर्व टोकातर वसलेला सात तालुक्यांचा जिल्हा महिन्याकाठी महिलांवर विविध बाचींवरील छळांच्या ३० ते ३५ तक्रारी सातत्याने दाखल होत असतात. यात विविध कारणे असली तरी कौटुंबिक कलह आणि हुंडधाराठी विवाहितेचा छळ होत असल्याचे दिसून येते. महिलेला असभ्य वागणूक देणे, माहेरच्या व्यक्तींना शिवीगाळ करणे, अशा बाबी घडत असतात, मात्र समाज काय म्हणेल या भीतीपोटी विवाहिता गप्प बसतात. त्याचीच फलश्रुती महिलांवरील अत्याचार वाढत असतात.

लहान-सहान कारणांनी केली जाते मानसिक पिळवणूक२०२७ मध्ये जानेचारी ते एप्रिल या कालावधीत स्त्रियांनी पुरुषांविरूद्ध ८४ तक्रारी केल्या. महिलांच्या छळाच्या सर्वाधिक तक्रारी पोलिसांत नोंद झाल्या. पतीने वा सासरच्या मंडळीने हुंडयासाठी प्रास दिल्याची कारणे दिली आहेत. तसेच अन्य बाबीही संसारामध्ये कुस्बुरी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. यात मुलांचा सांभाळ न करणे, चारीत्र्यावर संशय, माहेरच्या नावे टोमणे अशी कारणे असतात. 

शहरातील प्रमाण अधिकमहिलांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधी तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली जाते. या तक्रारींमध्ये ग्रामीणपेक्षा शहरातील तक्रारींचा भरणा अधिक आहे. भरोसा सेलकडे ते वर्ग करण्यात येते. त्यांची पोलिसांकडून समुपदेशनाच्या माध्यमातून समजूत काढण्यावर भर दिला जातो; मात्र काही तक्रारी समजण्यापलीकडे असतात. अशावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायद्यांचा आधार घेत न्यायालयात न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो.

गत चार महिन्यांत एकूण ८४ तक्रारीमहिलांच्या छळाविषयी भंडारा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गत चार महिन्यांत एकूण ८४ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. समुपदेशनाने मार्ग काढता येईल, यासाठी ती प्रकरणे भरोसा सेलकडे दिली जातात. यात इंडबासाठी महिला पिळवणुकीच्या तक्रारींची संख्या २०च्या जवळपास आहे. गत मे महिन्यात महिला छळतणुकीच्या सहा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत,

 

टॅग्स :bhandara-acभंडाराdowryहुंडाVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेCrime Newsगुन्हेगारी