जलयुक्त शिवारने भूजल पातळीत अर्धा मीटर वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:29 IST2018-11-04T21:29:20+5:302018-11-04T21:29:47+5:30
राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने भंडारा जिल्ह्यात जलक्रांती घडवून आणली. चार वर्षात सरासरीपेक्षा २८ टक्के पाऊस कमी होऊनही भूजलपातळीत मात्र अर्धा मीटरने वाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी होणार आहे.

जलयुक्त शिवारने भूजल पातळीत अर्धा मीटर वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने भंडारा जिल्ह्यात जलक्रांती घडवून आणली. चार वर्षात सरासरीपेक्षा २८ टक्के पाऊस कमी होऊनही भूजलपातळीत मात्र अर्धा मीटरने वाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी होणार आहे.
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १२८०.०३ मी.मी. आहे. जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत १०२५ मी.मी. पाऊस झाला. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत २५४.३३ मीमी म्हणजे १९८७ टक्के घट झाली. गत चार वर्षात साधारणत: २८ टक्के घट नोंदविण्यात आली. मात्र त्यानंतरही जिल्ह्याच्या भुजलपातळीत वाढ झाल्याचे दिसून येते. भुजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्याची २५ पानलोट क्षेत्रात विभागणी केली आहे. पाणलोट क्षेत्रातील उताºयानुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्र तीन भागात रन आॅफ झोन रिजार्ज, स्टोरेज झोनमध्ये विभागणी करण्यात आली. अशा प्रत्येक झोनमध्ये ७४ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या. सदर निरीक्षण विहिरींची सप्टेंबर २०१८ मध्ये नोंद घेण्यात आली. या नोंदीवरून भुजल पातळीत ०.४० मीटर वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पाच वर्षाची भुजल सरासरी पातळी २.५२ मीटर आहे. सप्टेंबर महिन्यात २.४७ मीटर पातळी असून यात ०.५० मीटर पाणी पातळी वाढली आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी या तालुक्यात सरासरी शून्य ते एक मीटर भुजल पातळी वाढलेली आहे.
ही किमया केवळ जलयुक्त शिवार योजनेमुळे साधता आला. २०१४ मध्ये भंडारा जिल्ह्याची भुजलपातळी २.८७ मीटर होती. आता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सप्टेंबरमध्ये भुजल पातळी २.४७ मीटर झाली आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, पवनी, लाखांदूर या तालुक्यात सरासरी ०.५० मीटर पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेने तालुक्यात जलक्रांती केली असून दुष्काळावर मात करण्यास मदत होणार आहे.
८१ हजार टीसीएम पाणीसाठा
भंडारा जिल्ह्यात चार वर्षात २०१ गावामध्ये जलयुक्त शिवारांची चार हजार ३५४ कामे पूर्ण झाली. या कामांमुळे ८१ हजार ५३९ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. यातून ३८ हजार ३३२ हेक्टर संरक्षीत सिंचन निर्माण झाले आहे. तर चार वर्षात १८७ गावे जलपरिपूर्ण झाली आहे. जलयुक्त शिवारमुळे शेतकºयांना वेळेवर पाणी उपलब्ध होत आहे.