ज्ञानरचनावाद ही सांघिक जबाबदारी
By Admin | Updated: February 29, 2016 00:24 IST2016-02-29T00:24:55+5:302016-02-29T00:24:55+5:30
शिक्षकांनी सृजनशिलतेचा वापर करून स्वयंप्रेरणा व जिज्ञासावृत्ती जागृत करावी. ज्ञानरचना वाद ही सांघीक जबाबदारी आहे.

ज्ञानरचनावाद ही सांघिक जबाबदारी
जाख शाळेत उपक्रम : ४४ शिक्षकांचा सहभाग, गटशिक्षणाधिकारी तिडके यांचे प्रतिपादन
भंडारा : शिक्षकांनी सृजनशिलतेचा वापर करून स्वयंप्रेरणा व जिज्ञासावृत्ती जागृत करावी. ज्ञानरचना वाद ही सांघीक जबाबदारी आहे. तसेच ज्ञानरचना वाद प्रक्रियेला बळकट करण्यासाठी लोकसहभाग वाढवावा, असे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी एस.एच. तिडके यांनी केले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत भंडारा तालुक्यातील जाख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय कार्यप्रेरणा व शैक्षणिक साहित्य निर्मिती चर्चासत्र या विषयावर कृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य मंजुषा जगनाडे या होत्या. उद्घाटन भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.एच. तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून केंद्र प्रमुख पी.जी. भोयर, दवडीपार येथील केंद्रप्रमुख जी.एस. भोयर, पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सादतकर, दिलीप बडवाईक उपस्थित होते. मार्गदर्शक ज्ञानेश्वर सादतकर, दिलीप बडवाईक यांनी शैक्षणिक साहित्यातून मुलांना अध्ययनकृती समजून घेण्यास सहज सोपे होते व त्यातून मिळणारे ज्ञान कायमस्वरुपी स्मरणात राहते. तसेच बालके स्वयंप्रेरित होऊन आनंदाने अध्ययन प्रक्रियेत सहभागी होतात असे मत व्यक्त केले.
मंजुषा जगनाडे म्हणाल्या, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षकांनी चांगले शिकवून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानरचना वादासारखे उपक्रम राबवावे. इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकणाऱ्या मुलांपेक्षा ग्रामीण भागातील मुलांना प्रगत होण्यासाठी नवनवीन साहित्यातून व तंत्रज्ञानातून माहिती देऊन प्रगत करावे. केंद्रप्रमुख भोयर यांनी ज्ञानरचनावाद प्रक्रिया शैक्षणिक साहित्याशिवाय अपुर्ण आहे. त्यासाठी शैक्षणिक साहित्यांची गरज आहे. असे मत व्यक्त केले. संचालन मुख्याध्यापक रमेश सिंगनजुडे यांनी तर आभार रविशंकर बिसने यांनी मानले. चर्चासत्रासाठी नंदा शहारे यांनी सहकार्य केले. यावेळी केंद्रातील उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदविधर शिक्षक व सहाय्यक शिक्षक असे एकुण ४४ शिक्षकांनी सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)