परराज्यातून गुटख्याची एंट्री

By Admin | Updated: July 23, 2015 00:30 IST2015-07-23T00:30:45+5:302015-07-23T00:30:45+5:30

तुमसर शहरासह तालुक्यात गुटख्यासह तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरु आहे. या पदार्थांची लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून एंट्री होत आहे.

Gutkha's entry from the other area | परराज्यातून गुटख्याची एंट्री

परराज्यातून गुटख्याची एंट्री

खोव्याचीही आवक : उत्पादन शुल्क व अन्न औषधी विभाग अनभिज्ञ
तुमसर : तुमसर शहरासह तालुक्यात गुटख्यासह तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरु आहे. या पदार्थांची लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून एंट्री होत आहे. राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असताना नियम बाह्यपणे हे पदार्थ विक्री करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजूनपर्यंत मोहीम उघडली नाही.
जिल्ह्याच्या सीमेवर तुमसर तालुका आहे. पान, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. तुमसर शहरात एका दिवशी किमान एक ते दीड पोती तंबाखू व दोन ते अडीच पोती सुपारी खर्ऱ्यात उपयोगात आणली जाते.
राज्य शासनाने मागील वर्षी गुटखा बंदीचा कायदा तयार केला. त्याची अंमलबजावणी सुरु झाली. परंतु प्रभावी अंमलबजावणी केवळ कागदावर दिसून येते. तुमसर शहर व तालुक्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरुच आहे. (तालुका प्रतिनिधी)

खाद्यपदार्थातही भेसळ
तुमसर शहरात अनेक खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. तुमसर शहरात मध्यप्रदेशातून दूध, दही व खोवा विक्रीकरिता येतो. या पदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. हा खोवा भंडारा व नागपूर येथेही नेला जातो अशी माहिती आहे. अन्नपुरवठा विभाग येथे याबाबत अनभिज्ञ आहे. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर ढिगभर अधिकारी आहेत. परंतु केवळ कागदी घोडे नाचविण्यातच त्यांचा वेळ जातो. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. निस्पक्ष तपासणी व चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Gutkha's entry from the other area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.