पावा मुलींच्या शाळेत गुरू पौर्णिमा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST2021-07-24T04:21:09+5:302021-07-24T04:21:09+5:30

भंडारा : येथील पार्वतीबाई वाठोडकर नवीन मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका करुणा इन्कने यांच्या अध्यक्षतेखाली गुरू पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...

Guru Pournima celebration at Pava girls school | पावा मुलींच्या शाळेत गुरू पौर्णिमा उत्सव

पावा मुलींच्या शाळेत गुरू पौर्णिमा उत्सव

भंडारा : येथील पार्वतीबाई वाठोडकर नवीन मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका करुणा इन्कने यांच्या अध्यक्षतेखाली गुरू पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका वीणा कुर्वे प्रामुख्याने उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका इन्कने यांनी गुरू व शिष्य यांचे नाते स्वच्छ व निर्मळ आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून समाजात वागायला पाहिजे, असे मत व्यक्त केले. आधुनिक गुरू व शिष्य यांची माहिती पटवून देताना गुरू व शिष्य यांचे आजचे बदलेले समाजातील स्थान याबाबत वीणा कुर्वे यांनी मार्गदर्शन केले. संचालन अंशू राऊत यांनी केले. आभार राणी रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका अनिता गजभिये, मंगला साटोणे, सुनीता हुकरे, वनिता खोकले, श्यामली नाकाडे, राणू करणाहके, योगिता वंजारी, प्रेमलाल मलेवर, रंजित खंगार, रमेश जांभोरे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Guru Pournima celebration at Pava girls school