गुंडाचा महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:21 IST2017-11-22T00:21:30+5:302017-11-22T00:21:53+5:30

एका तडीपार गुंडाने शाब्दिक वादानंतर त्याच्या दोन साथीदारांसह एका महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला केला.

Gunda's assault on Kurundi woman | गुंडाचा महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला

गुंडाचा महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला

ठळक मुद्देतुमसर येथील घटना : तीन आरोपींना अटक

आॅनलाईन लोकमत
तुमसर : एका तडीपार गुंडाने शाब्दिक वादानंतर त्याच्या दोन साथीदारांसह एका महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी रात्री १० वाजता घडली.
लक्ष्मी रमेश मलेवार (४५) रा.शिवाजीनगर असे या जखमी महिलेचे नाव आहे. आदित्य दिनेश पांडे रा.खापा असे या तडीपार गुंडाचे नाव असून मयूर मलेवार व शुभम आगाशे रा.शिवाजी नगर अशी अन्य दोन आरोपींची नावे आहेत.
हे तिघेही रात्री मद्यप्राशन करून लक्ष्मी मलेवार यांच्या अंगणातून जाताना आरोपी व मलेवार यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आदित्य पांडे व त्याच्या दोन साथीदारांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यानंतर हे तिनही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
याप्रकरणी तुमसर पोलिसांनी आरोपींविरूद्ध भादंवि ३०७, ४४७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून अवघ्या अर्धा तासात तिनही आरोपींना अटक केली. तपास पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय म्हैसकर करीत आहेत. आठ दिवसापूर्वी एका तडीपार गुंडाला तुमसर पोलिसांनी शहरातून अटक केली होती, हे विशेष.

Web Title: Gunda's assault on Kurundi woman