स्वातंत्र्यानंतर प्रथमच पाहिले पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:26 IST2018-11-04T21:26:15+5:302018-11-04T21:26:36+5:30

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलवादी भागातील केसलवाडा पवार या गावात पोलिस चौकीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.

Guardian Minister, seen for the first time since independence | स्वातंत्र्यानंतर प्रथमच पाहिले पालकमंत्री

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पाहिले पालकमंत्री

ठळक मुद्देकेसलवाडा पोलीस चौकीचे उद्घाटन : ग्रामस्थांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलवादी भागातील केसलवाडा पवार या गावात पोलिस चौकीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला आमदार बाळा काशीवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, तहसीलदार मलिक विराणी, सरपंच अनील नंदेश्वर, मोरेश्वर पटले, कांबळे, नूतन पवार आदी उपस्थित होते.
कोका जंगलाचा हा भाग असून काही प्रमाणात नक्षल भाग आहे. आजपर्यंत एकही पालकमंत्री या गावाने पहिला नाही. या गावात येणारे ना. बावनकुळे हे पहिलेच पालकमंत्री आहेत. भारतमाता व महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन ना. बावनकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
आ. बाळा काशिवार यांनी या चौकीसाठी चार वर्षे पाठपुरावा केला. वर्ग दोनचे जमिनीचे प्रकरण वर्ग १ मध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला. ५०० फुटापर्यंत सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतला. पंतप्रधान आवास योजनेत सर्वांसाठी घरे योजना आली आहे. आपल्या सरकारला 4 वषार्चे झाले आहेत. या काळात शासनाने जास्तीत जास्त लोकोपयोगी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने ६५ योजनांसाठी भंडारा जिल्ह्याला निधी दिला आहे. यंदा जिल्हा नियोजन समिती १४० कोटीवरून २०० कोटींवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर आणणार आहे. तसेच सर्व शाळा डिजिटल केल्या जाणार आहेत, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.
नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे, मालमत्तेचे रक्षण करणे ही आमची पहिली जबाबदारी आहे. पोलिस मित्र बना. एका गावातून ५ तरुण पोलिस मित्र बना. पोलिसांना मदत करा. जुन्या काळात पोलीस लागतच नव्हते. समाजमन चांगले असले की पोलिसांची गरज पडत नाही. पोलीसही शेवटी माणूस आहे, याचा विचार केला पाहिजे. या चौकीच्या बांधकामासाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा ना. बावनकुळे यांनी केली. पोलीस चौकीशिवाय हा भाग सुटला होता. पण मुखमंत्री देवेंद्र फडणविस यांनी ही मागणी मान्य केली आणि आज उदघाटन होत आहे, असे आ. काशिवार म्हणाले. ठाणेदार मंडलवार यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Guardian Minister, seen for the first time since independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.