तुडतुडा ठरला शेतकºयांसाठी कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:01 IST2017-10-25T00:01:04+5:302017-10-25T00:01:14+5:30

निसर्गाचा सततचा लहरीपणा आणि वातावरणातील बदलामुळे धानावर येणाºया किडींच्या प्रादुर्भावाचा शेतकºयांना सामना करावा लागत आहे.

Groundnut for Farmers | तुडतुडा ठरला शेतकºयांसाठी कर्दनकाळ

तुडतुडा ठरला शेतकºयांसाठी कर्दनकाळ

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : पवनी तालुक्यात किडीने बेजार

लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव (चौ.) : निसर्गाचा सततचा लहरीपणा आणि वातावरणातील बदलामुळे धानावर येणाºया किडींच्या प्रादुर्भावाचा शेतकºयांना सामना करावा लागत आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेले धानपीक वाचविण्या साठी शेतकºयांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. परंतु निराशाचा येत आहे. सध्यातरी तुडतुडा कीड शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.
धानाचे उत्पन्न वाढीच्यादृष्टीने नर्सरी लागवडी व त्यानंतर रोवणीपासून खते व औषधांची फवारणी करून किडींवर प्रतिबंध आणण्याचा शेतकरी प्रयत्न करतो. परंतु मागील एक दशकापासून तुडतुडा किडावर प्रतिबंध लावण्यात शेतकºयांना मात्र यश आलेले नाही. यावर्षी रोवणी फारच उशिरा झाली. त्यानंतर पावसाने दगा दिला. कसेबसे करून धानपिकांना पाणी देऊन पीक वाचविले. हलके धान कापणीला आले असून जड धान लोंबीवर आहेत. त्यावर तुडतुडा किडीने आक्रमण केले आहे. या किडीला रोखण्यात शेतकरी हताश झाल्याचे चित्र आहे. प्रत्येकच धान उत्पादक शेतकºयाला तुडतुडा किडीने हैराण करून सोडले आहे. आता तोंडाशी आलेले धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक रासायनिक औषधांची फवारणी करूनही तुडतुडा किड जुमानत नसल्याचे चित्र आहे. यावर प्रतिबंध आणण्यासाठी कृषी विभागाने कोणते किटकनाशक फवारणी करायचे याबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Groundnut for Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.