बुद्धपौर्णिमेच्या पर्वावर भगवान बुद्धांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST2021-05-28T04:26:04+5:302021-05-28T04:26:04+5:30

भंडारा : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती भंडाराच्या वतीने त्रिमूर्ती ...

Greetings to Lord Buddha on the occasion of Buddhapurnima | बुद्धपौर्णिमेच्या पर्वावर भगवान बुद्धांना अभिवादन

बुद्धपौर्णिमेच्या पर्वावर भगवान बुद्धांना अभिवादन

भंडारा : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती भंडाराच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भन्ते नागसेन, प्रमुख अतिथी डॉ. अश्ववीर गजभिये, समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ गडकरी, न.प.चे माजी उपाध्यक्ष आशू गोंडाने यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून पूजन करण्यात आले, भन्ते यांनी त्रिशरण, पंचशील उपस्थितांना दिले. सामूहिक बुद्धवंदनेनंतर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला असित बागडे, शरद खोब्रागडे, पायल सतदेवें, मृणाल गोस्वामी, मदन बागडे, प्रफुल्ल शेंडे, अमित उके, श्रीकांत बंसोड, ॲड. नेहा शेंडे, ऋषिकेश चाबूकस्वार, सचिन बागडे, अविनाश साखरे, नरेंद्र भोयर, नागदेवें, तथा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालन असित बागडे व आभार सिद्धार्थ गडकरी यांनी केले.

Web Title: Greetings to Lord Buddha on the occasion of Buddhapurnima