जिल्हाभर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:00:35+5:30
भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. येथे लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील नागरिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांसह बुद्धविहारात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

जिल्हाभर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरी करण्यात आली.
भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. येथे लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील नागरिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांसह बुद्धविहारात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. मात्र प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीच्या नियमांचे पालन केल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांनी आपल्या घरीच बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तथागत संबुद्धाला वंदन करून प्राणीमात्राविषयी मंगल कामना व मंगल मैत्री केली. तसेच डॉं.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या ग्रंथांचे वाचन करण्यात आले. सायंकाळी घरासमोर मेणबत्या प्रज्वलीत करून कोरोनाबाधीतांच्या स्वास्थ्यासाठी मंगल कामना करण्यात आली.