ग्रामपंचायत पदभरती प्रक्रियेत घोळ
By Admin | Updated: August 2, 2014 23:56 IST2014-08-02T23:56:49+5:302014-08-02T23:56:49+5:30
तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिकीची जतन करणाऱ्या ग्रामपंचायत परसोडी जवाहरनगर येथील कर्मचारी भरती प्रक्रियेत घोळ करण्यात आले आहे. झालेली निवड रद्द करावी व दोषी असलेल्या

ग्रामपंचायत पदभरती प्रक्रियेत घोळ
जवाहरनगर : तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिकीची जतन करणाऱ्या ग्रामपंचायत परसोडी जवाहरनगर येथील कर्मचारी भरती प्रक्रियेत घोळ करण्यात आले आहे. झालेली निवड रद्द करावी व दोषी असलेल्या अधिकाऱ्या विरूद्ध कारवाही करण्याची ग्रामस्थ व मुलाखतीला आलेल्या उमेदवाराची मागणी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायत परसोडी जवाहरनगर अंतर्गत दोन कायम व एक तात्पुर्ता स्वरूपाचे कर्मचारी होते. पैकी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती सेवा ज्येष्ठतेनुसार मार्च महिन्यात पदोन्नती होवून ग्रामसेवक म्हणून करण्यात आली. परिणामी एक पद ग्रामपंचायतमध्ये रिक्त झाले. त्या अनुसंघाने लिपीक वसुली कारकुन या रिक्त पदाकरिता १६ जुलै रोजी जाहीरनामा काढण्यात आला. २८ जुलै रोजी १७ उमेदवारांची तोंडी मुलाखतीत घेण्यात आले. यात नव्याने एक ते दोन वर्ष रहिवासी झालेली महिलांची निवड करण्यात आली. पैकी मुलाखतीला आलेल्या उमेदवाराने विचारना केलेल्या प्रश्नांची अचुक उत्तरे देवून सुद्धा कमी गुण देण्यात आले. निवड झालेल्या उमेदवाराकडे पुरेसे कागदपत्र नसल्याने दोनवेळा घरी पाठविण्यात आले आणि शेवटी त्याच महिलेची निवड करण्यात आली. हा एक नसमजण्यासारखा प्रश्न आहे. यात वसलिेबाजी झालेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्यक्ष मुलाखत असताना संगणकावर परिक्षा घेण्यात आली. एकूण गुण पूर्ण देण्याऐवजी अर्धा स्वरूपाचे एकूण गुण देण्यात आले, असा आरोप मुलाखतीमधील उमेदवारांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या पद भरती प्रक्रियासाठी कोणत्याही ग्रामसभेची मंजुरी नाही. यावरून झालेली प्रक्रिया ही नियमबाह्य असल्याचे सिद्ध होते.
दरम्यान आज तहकुब असलेली ग्रामसभा घेण्यात आली. विषय सुचीनुसार सार्थक चर्चा करण्यात आली. यात अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयावरील हा मुद्दा ग्रामस्थानी उचलुन धरला. यावर सभाअध्यक्ष सरपंच यांनी हा वेळेवर आलेला अर्ज आहे. यावर दोन दिवसांनी वेगळी सभा घेवून त्यात याविषयी माहिती देण्यात येईल. यावर ग्रामस्थ यांनी आजच यावर चर्चा करून निवाडा करण्यात यावा अग्रही मागणी केली. शेवटी अध्यक्षांनी मागणी मान्य केली. दरम्यान ग्रामविकास अधिकारी यांना शहापूर येथील सभा असल्याचे सांगून ग्रामपंचायत कार्यालयमधून पलायन केले. यात ग्रामस्थांच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या गाडीला घेराव घातला. गाडीला घेराव घातल्याने ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांचा कॉलर पकडून मारण्याचा प्रयत्न केले असता ग्रामस्थानी मध्यस्थी करून प्रकरण निवडण्यात आले. (वार्ताहर)