नायक खराबे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By Admin | Updated: January 9, 2017 00:26 IST2017-01-09T00:26:05+5:302017-01-09T00:26:05+5:30

सोनेगाव नागपुर येथे एअरफोर्स ४४ विंग मध्ये कार्यरत नायक दिलीप खराबे (५०) यांचा ६ जानेवारीला नागपुर येथे मृत्यू झाला होता.

Government funeral on Nayak Kharaab | नायक खराबे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नायक खराबे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

साकोली : सोनेगाव नागपुर येथे एअरफोर्स ४४ विंग मध्ये कार्यरत नायक दिलीप खराबे (५०) यांचा ६ जानेवारीला नागपुर येथे मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर काल पहेला येथील त्यांया मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हवेत फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली.
भंडारा जिल्ह्यातील पहेला या गावचे रहिवासी असलेले दिलीप खराबे हे १९९० ला सैन्यात भरती झाले होते. मागील दहा वर्षापूर्वी ते सोनेगाव नागपूर येथील एअरफोर्समध्ये कार्यरत होते. ६ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सेवेर हजर झाले. मात्र अचानक त्यांची प्रकृती खराब झाली. त्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नायक खराबे यांचे पार्थिव सोनेगाव येथील सैन्याच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे सैन्यातील अधिकाऱ्यांनी श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर लगेच खराबे यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी पहेला येथे आणण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. याप्रसंगी सुबेदार वामन गायधने, नायर आर. के. लावण्य, डी.एससी हरिसींग मेटकुरे, कमांडो किशोर पांडे, गावचे सरपंच सुनिल शेंडे, पोलीस पाटील महादेव डहारे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास भुरले, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर सपाटे यांचासह शासकीय अधिकारी, तथा ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Government funeral on Nayak Kharaab