गोसीखुर्द प्रकल्प घालतोय पर्यटकांना भुरळ
By Admin | Updated: July 28, 2014 23:22 IST2014-07-28T23:22:10+5:302014-07-28T23:22:10+5:30
पर्यटन क्षेत्रात अतिशय झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे मोठ्या प्रमाणात उघडी आहे. वक्रद्वारातून वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचा

गोसीखुर्द प्रकल्प घालतोय पर्यटकांना भुरळ
धरणावर गर्दीच गर्दी : जिल्हा प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
गोसे (बुज.) : पर्यटन क्षेत्रात अतिशय झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे मोठ्या प्रमाणात उघडी आहे. वक्रद्वारातून वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचा खळ खळाट पाहण्याकरीता रोज पर्यटक मोठ्या संख्येत भेट देवून धरणाच्या सौंदर्याचा आठवणी आपल्या सोबत घेवून जात आहेत.
गोसीखुर्द धरण या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे या धरणाविषयी माहिती पुर्ण देशात पसरून हे स्थळ देशाच्या पर्यटनस्थळाच्या नकाशावर आले आहे. त्यामुळेच हे धरण विदर्भातील एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे.
गोसीखुर्द धरणाच्या घाटउमरीच्या बाजुने असलेले घनदाट विस्तीर्ण जंगल, वनराईने नटलेल्या डोंगर दऱ्या, जवळूनच वाहणारे उजव्या कालव्यातील पाणी पाहून भेट देणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले जातात. सध्या वैनगंगा नदीला पुर येवून मोठा प्रवाह गोसीखुर्द धरणात येत असल्यामुळे धरणाची सर्व ३३ वक्रदारे घडतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रत्तत केला जात आहे.
या ३३ वक्रदारातून निघणाऱ्या धरणाच्या पाण्याचा प्रवाह खाली वैनगंगा नदीतून वाहत जातो. त्यातच उठणाऱ्या पाण्याच्या लाटा हे दृश्य पाण्याकरीता पर्यटकांची पाऊले गोसीखुर्द धरणाकडे वळत आहेत. गोसीखुर्द धरणाचे अप्रतीम सौंदर्य, धरणाच्या ३३ वक्रदारातून निघणारे पाणी, धरणात साठविलेले पाणी यामुळेच हे धरण पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत आहे.
सध्या धरणाची सर्व वक्रदारे उघडल्यामुळे या धरणाचे सौंदर्य पाहण्याकरीता रोजच मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असून आपल्या सोबत धरणाच्या आठवणी घेवून जात आहेत. धरणाला लागूनच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे पवनी परिक्षेत्राचे जंगल आहे. या अभयारण्यासह गोसीखुर्द धरण मिळून हे एक चांगले पर्यटन स्थळाच्या रूपाने विकसीत होत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या व्यवसायाची तालुक्यात मोठी वाढ होत आहे. (वार्ताहर)