शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पाच वर्षात गोसेखुर्दला दमडीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 9:29 PM

साधन संपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारने संकटाचा खाईत नेवून ठेवले आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनात कुठलाही आमुलाग्र बदल झालेला नाही. आघाडी सरकारने गोसेखुर्द धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला होता.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : आसगाव येथे शेतकरी जनजागृती मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव चौ. : साधन संपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारने संकटाचा खाईत नेवून ठेवले आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनात कुठलाही आमुलाग्र बदल झालेला नाही. आघाडी सरकारने गोसेखुर्द धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला होता. मात्र मागील पाच वर्षात केंद्र सरकारने गोसेखुर्द धरणासाठी एक दमडीही दिलेली नाही. परिणामी येथील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.आसगाव येथे मध्यवर्ती बँक शाखेच्या एटीएम केंद्राचे उद्घाटन व शेतकरी जनजागृती मेळाव्याप्रसंगी उद्घाटक म्हणून खा. पटेल बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार होते. विशेष अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, नाना पंचबुध्दे, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, पालक संचालक अशोक मोहरकर, बाजार समितीचे सभापती लोमेश वैद्य, जि.प. सदस्य चित्रा सावरबांधे, पं.स. सदस्य मंगेश पाटील ब्राम्हणकर, खरेदीविक्री संस्थेचे अध्यक्ष माणिक ब्राम्हणकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक हत्तीमारे, सरपंच विपीन बोरकर, जि.प चे माजी सदस्य विजय सावरबांधे, माजी संचालक किशोर पालांदूरकर, मोहन सुरकर, अर्चना वैद्य, पंढरीनाथ सावरबांधे, गोपाल सावरबांधे, मोहन पंचभाई, हिरालाल खोब्रागडे, यादव डोये, बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, सरव्यवस्थापक संजय बर्डे आदी उपस्थित होते.प्रफुल्ल पटेल म्हणाले, काँग्रेस सत्तेत असतांना आम्ही सरसकट कर्जमुक्ती केली. मात्र विद्यमान सरकारने जाचक अटी लावून शेतकऱ्यांना वेटीस धरले आहे. आजघडीला भेल कारखान्याची अवस्था सर्वांना माहित आहे. बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासनही हवेत विरले आहेत. विदर्भातील सर्वच जिल्हे विकास कामापासून मागे आहेत.विदर्भाचे मुख्यमंत्री असतांनाही त्याच विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. भाजप सरकारने जनसामान्यांसाठी काय केले. असा प्रश्न उपस्थित करुन शेतकºयाना या सरकारने सर्वात मागे टाकले आहे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकार कमी केल्यामुळे यापुढे या संस्थांचा निवडणूकीत उभे राहावे की नाही असा प्रश्न उमेदवारांसमोर उभा राहणार आहे. धर्माचा नावावर मत मागणाऱ्यांना नागरिकांनी धडा शिकविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्या मुख्य उपस्थितीत एटीएम चे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी तर आभार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर यांनी मानले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल