शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेतीविरुद्ध कारवाईत भंडाऱ्यातील १ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:21 IST

६ टिप्पर व १ ट्रॅक्टर जप्त : २४ तासांत जिल्हाभर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा पोलिसांनी रेती चोरट्याविरुद्ध कंबर कसली आहे. दोन दिवसात रेतीची अवैध वाहतुकीवरील कारवाईत वाहन आणि रेतीसह १ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात ६ टिप्पर व १ ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई तुमसर, करडी, पवनी, साकोली पोलिसांच्या हद्दीत करण्यात आली. 

तुमसर पोलिसांनी शनिवारी (दि. १४) अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत रेतीच्या ३ टिप्परसह २१ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील रस्त्यावर पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई झाली. एमएच ४० सीझेड २७९२ (चालक/मालक सोमेन्द्र प्रमोद हलमारे, बासोरा), एमएच ४० सीएम ७७५० (चालक/मालक अक्षय श्यामराव लुटे, बासोरा), एमएच ४० सीड्रोड ४१४१ (चालक/मालक प्रशांत लक्ष्मीकांत बारसागडे, सोनेगाव) हे टिप्पर व मालक आहेत. प्रत्येकी टिप्परमध्ये सुमारे ६० हजार रुपयांची रेती आढळून आली. तीन टिप्परमधून प्रत्येकी अंदाजे १० ब्रास रेती वाहून नेली जात होती. 

त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत परवाने नव्हते. त्यांनी तामसवाडी रेती घाटावरून रेतीची चोरटी वाहतूक निष्पन्न झाले. करडी पोलिस अंतर्गत असलेल्या देव्हाडी टी पॉइंट चौक येथे टिप्परमध्ये रेती भरून अवैध वाहतूक करताना पोलिसांना आढळले. टिप्परचालक अनिल संतकुमार यादव (३०, सुरगाव) वाहनमालक योगेश रहांगडाले (३२, सुरगाव) यांच्या सांगण्यावरून तीन ब्रास रेती किन्ही तासगाव रेतीघाट तिरोडा येथून भरण्यात आली होती. ५० लाख १८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला.

साकोली पोलिस ठाणे अंतर्गत सासरा मिरेगाव रस्त्यावर पेट्रोलिंग दरम्यान ट्रॅक्टरमध्ये रेतीची वाहतूक करताना आढळून आले. ट्रॅक्टरचालक विलास गोटेफोडे (५५, कटंगधरा, ता. साकोली), मालक शालीकराम खर्डेकर (६०, सासरा) यांच्या सांगण्यावरून सासरा येथील चूलबंद नदीच्या पत्रातून परवानगी न घेता रेती चोरी केल्याचे निष्पन्न झाले. 

आता तामसवाडी घाटाकडे माफियांचे लक्षमोहाडी तालुक्यातील तामसवाडी घाटावरून रेतीची तस्करी केल्याचे तुमसर पोलिसांच्या कारवाईत उघड झाले आहे. यावरून आता रेतीमाफियांनी तामसवाडी घाटाकडे आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. या घाटावरून मोठ्या प्रमाणावर रेतीचा अवैधपणे उपसा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता आपला मोर्चाही त्या दिशेने वळविलेला दिसत आहे. या क्षेत्रामध्ये पोलिसांची प्रतिबंधात्मक मोहीम वाढली आहे.

पवनी पोलिसांकडून मध्यरात्री कारवाईपवनी पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री कारवाई करून तीन टिप्पर पकडले. वडेगाव फाट्यावर पेट्रोलिंग करीत असताना रेतीची चोरटी वाहतूक करताना आढळून आली. एमएच २७ एक्स ७६१० (चालक तेजस गणेश मानकर, पचखेडी, मालक प्रफुल देवीदास भाले, मंडईपेठ, अड्याळ), एमएच ४० बीजी ८७६ (चालक उमेश रमेश जांभुळकर, कोरंभी, मालक गणेश योगेश्वर खंदाडे, बोरी नागपूर) यांच्याविरुद्ध पवनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यांच्या ताब्यातून ४० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तासगाव, चुलबंद घाटावरही तस्करमोहाडी तालुक्यातील तासगाव तसेच साकोली तालुक्यातील चुलबंद नदीघाटावरही रेती तस्करांचा उच्छाद आहे. या दोन्ही घाटांवर पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाया व गस्त दिवसरात्र सुरु आहे. 

"रेती तस्करांविरुद्धच्या कारवाया थांबविल्या जाणार नाहीत. त्या सुरूच राहतील. या गैरप्रकारात आढळणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही. "- नुरूल हसन, अधीक्षक, जिल्हा पोलिस

टॅग्स :sandवाळूmafiaमाफियाbhandara-acभंडारा