शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

सनई चौघड्यांच्या गजरात भंडारेकरांनी बांधली चक्क देवाचीच लगीन गाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 6:00 AM

भंडारा येथील खात रोडवर श्री सिध्दचिंतामणी गणपती मंदिर आहे. या मंदिराच्यावतीने ब्रम्हत्सोव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहिल्या टप्यात गतवर्षी राजोपचार पूजा थाटात करण्यात आली होती. त्यानंतर यंदा दुसऱ्या वर्षी ब्रम्होत्सवाची संकल्पपूर्ती करीत गणपती बाप्पांचा विवाह सोहळा पार पडला. विदर्भात पहिल्यांदाच असा आगळावेगळा विवाह सोहळा गुरुवारी भंडारेकरांनी अनुभवला.

ठळक मुद्देश्री सिद्ध चिंतामणी मंदिरात सोहळा : चार दिवसीय विवाह सोहळ्याला गणेशभक्तांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्न गाठी देव स्वर्गात बांधतो असे म्हटले जाते. मात्र भंडारेकरांनी चक्क देवाचीच लग्नीन गाठ बांधली आणि सनई चौघड्याच्या गजरात गणपती बाप्पा आणि सिध्दीबुध्दीला विवाह बंधनात बांधले. येथील श्री सिध्दीचिंतामणी गणपती मंदिरात चार दिवसांपासून सुरु असलेल्या या विवाह सोहळ्याची सांगता गुरुवारी शुभमंगल सोहळ्याने झाली. या सोहळ्यात हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते.भंडारा येथील खात रोडवर श्री सिध्दचिंतामणी गणपती मंदिर आहे. या मंदिराच्यावतीने ब्रम्हत्सोव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहिल्या टप्यात गतवर्षी राजोपचार पूजा थाटात करण्यात आली होती. त्यानंतर यंदा दुसऱ्या वर्षी ब्रम्होत्सवाची संकल्पपूर्ती करीत गणपती बाप्पांचा विवाह सोहळा पार पडला. विदर्भात पहिल्यांदाच असा आगळावेगळा विवाह सोहळा गुरुवारी भंडारेकरांनी अनुभवला.या लग्नाच्या निमित्ताने दोनही घरी मांडव घालण्यात आला. नवऱ्या मुलीला मेहंदी लावण्यात आली. सीमांत पूजनही झाले. गुरुवार ३० जानेवारी हा ब्रम्होत्सवाचा दिवस उजाळला. सकाळी १०.३० वाजता गणपती बाप्पा आणि सिध्दीबुध्दी यांचा सांग्रसंगीत विवाह सोहळा पार पडला. वाजत गाजत भंडारा नगरीतून मिरवणूक काढण्यात आली. खरे तर हा विवाह सोहळा अगदी चार दिवस चालला. २६ जानेवारीच्या दिवशी सवाष्ण पूजन झाले. काकडे व निखाडे दाम्पत्याने सिध्दीबुध्दीचे तर रामेकर दाम्पत्याने गणपती बाप्पाचे कंकन बांधले. दोन्ही घरी मांडव घालण्यात आला. बुधवारी वधुवरांच्या घरी हळदीचा कार्यक्रम पार पडला. संध्याकाळी सीमांत पूजन झाले. साक्षात परमेश्वराचा हा सोहळा अगदी वेगळाच आणि तो पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली.विवाह मुहूर्ताचा गुरुवार दिवस उजाळला. सकाळी ९ वाजता बहिरंगेश्वर मंदिर परिसरातून वरात चिंतामणी मंदिराच्या दिशेने निघाली. बग्गीत विराजमान सिध्दीबुध्दी आणि पालखीत गणपतीबाप्पा. अश्व, मंगलवाद्य आणि बॅण्डच्या गजरात खºयाखुºया लग्नवरातीलाही लाजवेल अशी वरात मंडपात पोहोचली. मंगलाष्टके झाली. बाप्पा लग्नीन गाठीत बांधले गेले. शेकडो वºहाड्यांनी अक्षतरुपी पुष्पांची वधुवरांवर वृष्टी केली. तब्बल दोन तास सुलग्न सुरु होते. गणपतीच्या लग्नाला ३३ कोटी देवतांची उपस्थिती लाभली म्हणून ३३ जोडप्यांचे ब्रम्हभोजन झाले. सप्तपदी, ओमहवन आणि एवढेच नाही तर विहिणीची पंगतही आटोपली.दिवसभराचे सोपस्कार पार पडल्यानंतर वरात परतीच्या प्रवासाला निघाली. सजविलेल्या बग्गीत गणपतीबाप्पा रिध्दीबुध्दीला सोबत घेवून नगरभ्रमणासाठी निघाले. दीड तास नगरभ्रमणानंतर वरात वरपिता रामेकरांच्या घरी पोहोचली. भंडारा शहरातच नव्हे तर विदर्भात पहिल्यांच झालेला हा आगळावेगळा सोहळा अनेकांनी अनुभवला. गणपतीची उपासना घराघरात पोहोचावी या हेतूने मंदिर व्यवस्थापनाने हा विवाह सोहळा आयोजित केला होता.

टॅग्स :marriageलग्न