तलाठी कार्यालयात आॅनलाईन सात बारा द्या
By Admin | Updated: August 27, 2016 00:22 IST2016-08-27T00:22:19+5:302016-08-27T00:22:19+5:30
शेतकरी, नागरिक, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाकरिता आॅनलाईन सातबारा सोबत नियमित सातबारा देण्यात यावे,

तलाठी कार्यालयात आॅनलाईन सात बारा द्या
तहसीलदारांना निवेदन : भंडारा तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
भंडारा : शेतकरी, नागरिक, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाकरिता आॅनलाईन सातबारा सोबत नियमित सातबारा देण्यात यावे, अशी मागणी भंडारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकपूर राऊत यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या निवेदनामध्ये, आॅनलाईन पद्धतीमुळे तालुक्यातील संपूर्ण तलाठी कार्यालयातील महत्वाची कामे खोळंबलेली आहेत. यामुळे तालुक्यातील गोरगरीब शेतकरी, शेतमजुर व विद्यार्थी यांना चार चार महिन्यापर्यंत प्रमाणपत्रासाठी वाट बघावी लागते. महत्वाच्या योजनांची कामे वेळोवेळी पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रेम वनवे, पं.स. सदस्य सुनिता नागफासे, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, अजय गडकरी, निलकंठ कायते, कुंदा वाघाडे, शालिक भुरे, आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)