बेलाटी येथील अतिक्रमण धारकांना मालकी पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:38+5:302021-03-28T04:33:38+5:30

तालुक्यातील बेलाटी येथील शासकीय जमीन गट क्र.५३७ मधील शासकीय अनेक भूखंडांवर गत ५० वर्षांपूर्वीपासून काही कुटुंब अतिक्रमित घरात कुटुंबासह ...

Give ownership leases to encroachment holders at Belati | बेलाटी येथील अतिक्रमण धारकांना मालकी पट्टे द्या

बेलाटी येथील अतिक्रमण धारकांना मालकी पट्टे द्या

तालुक्यातील बेलाटी येथील शासकीय जमीन गट क्र.५३७ मधील शासकीय अनेक भूखंडांवर गत ५० वर्षांपूर्वीपासून काही कुटुंब अतिक्रमित घरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. या अतिक्रमित घरात कुटुंबासह निवासी सोयीने वास्तव्यास असताना येथील ग्रामपंचायत अभिलेखात कराची नोंददेखील करण्यात आली आहे. मात्र, या घरांच्या जमिनीचे मालकीपट्टे नसल्याने हे कुटुंब शासनाच्या विविध योजनांसह निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारीपासून वंचित आहेत.

यासंबंध गैरसोयींची दखल घेत शासनाने तालुक्यातील बेलाटी येथील कुटुंबांना मालकीपट्टे देण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. लाखांदूरचे तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांना निवेदन देताना प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख धनराज हटवार, तालुका युवा प्रमुख अविश शेंडे, बेलाटी शाखाप्रमुख अरविंद राऊत, जनसंपर्क प्रमुख खेमराज भुते यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Give ownership leases to encroachment holders at Belati