लोकप्रतिनिधीप्रमाणे संधी द्यावी
By Admin | Updated: May 21, 2016 00:33 IST2016-05-21T00:33:03+5:302016-05-21T00:33:03+5:30
गावातील तंटे गावाताच मिटावे व गावात शांतता नांदावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठीत करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधीप्रमाणे संधी द्यावी
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पाच वर्षांचा कार्यकाळ करण्याची तंटामुक्त जिल्हा समितीची मागणी
भंडारा : गावातील तंटे गावाताच मिटावे व गावात शांतता नांदावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती अध्यक्षाचा कार्यकाळ एक वर्षावरुन पाच वर्षाचा करावा अशी मागणी भंडारा जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त समितीने केली आहे.
याबाबत समितीने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. समितीने निवेदनात म्हटले की, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षाचा कार्यकारी एक वर्षाचा असतो. त्यानंतर समिती बदलवून नविन समिती गठीत करण्यात येते. याकरिता १५ आॅगस्टला ग्रामसभेतून ही निवड करण्यात येते.
मात्र तंटामुक्त गाव समितीचे काम चांगले असल्यानंतरही शासनाच्या नियमामुळे त्यांना बदलविण्यात येते. तंटामुक्त गाव समिती कायमस्वरुपी कार्यरत राहील, समिती सदस्यांच्या प्रगतीना राहत नसतील, समितीच्या कामासाठी वेळ देत नसतील, समितीच्या कामात रस घेत नसतील व अडथळा निर्माण करणाऱ्या सदस्यांना बदलविण्यात यावे, एक तृतीयांश पेक्षा अधिक सदस्य बदलविता येत नाही. असे असतांना ग्रामसभेची नोटीस बजाविताना ग्रामसेवक अध्यक्ष बदलविण्याचा विषय समोर ठेवतात. ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पाचवर्षांचा असतो. त्याचप्रमाणे तंटामुक्त गाव समितीचा ही कार्यकाळ पाच वर्षाचा ठेवावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे जिल्हाध्यक्ष सैय्यद जाफरी, जिल्हासचिव देवाजी वाघमारे, जगन्नाथ बडवाईक, मनोहर कामथ, सचिन हिंगे, विठ्ठल जगनाडे, यामिनी बांडेबुचे, लोकेश्वर बडगे, चरणदास बावणकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)