आई-वडिलांसमोरच तरुणीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:41 IST2021-03-01T04:41:25+5:302021-03-01T04:41:25+5:30

साकोली : तालुक्यातील एका गावात आई-वडिलांसमक्षच एका तरुणीचे चार ते पाच जणांनी घरातूनच अपहरण केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ...

The girl was abducted in front of her parents | आई-वडिलांसमोरच तरुणीचे अपहरण

आई-वडिलांसमोरच तरुणीचे अपहरण

साकोली : तालुक्यातील एका गावात आई-वडिलांसमक्षच एका तरुणीचे चार ते पाच जणांनी घरातूनच अपहरण केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेची तक्रार साकोली पोलिसात देताच तपासाची चक्रे फिरवित पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांच्या हाती अन्य इसम व तरुणीचा पत्ता लागला नाही.

सूत्रांनुसार साकोली तालुक्यातील एका गावात शनिवारी रात्रीच्या सुमारास चार ते पाच इसम घरात शिरले. यावेळी तरुणीचे आई-वडील व भाऊ घरात उपस्थित होते. त्या तरुणीचे आई-वडील व भावासमोरच अपहरण केले. याची तक्रार मुलीच्या भावाने रात्रीच साकोली पोलीस ठाण्यात दिली. तक्रार मिळतात पोलिसांचे पथक नागपूरकडे रवाना झाले. पोलिसांनी पाठलाग करीत इसमांपैकी दोन जणांना ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेले वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र अपहरण झालेली मुलगी व अन्य इसमांचा शोध लागलेला नाही. तपास साकोली पोलीस करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे घटनेतील सर्व इसम हे नागपूर येथील असल्याचे समजते.

Web Title: The girl was abducted in front of her parents