शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आहाराव्दारे मिळवा तणावापासून मुक्ती

By admin | Updated: November 9, 2014 22:28 IST

तणाव ही एकविसाव्या शतकाने दिलेली देण आहे. सध्याचा काळ तणावाचा असल्याचे म्हटले जात आहे; पण त्यासोबत तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल यासाठीही उपाय शोधले जात आहेत.

भंडारा : तणाव ही एकविसाव्या शतकाने दिलेली देण आहे. सध्याचा काळ तणावाचा असल्याचे म्हटले जात आहे; पण त्यासोबत तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल यासाठीही उपाय शोधले जात आहेत. योग, ध्यानधारणा, सकारात्मक विचार, व्यायाम, मसाज, अरोमाथेरपी, म्युझिक थेरपी असे तणावावरचे अनेक उपाय आपण शोधून काढले आहेत. आता आहाराच्या माध्यमातून तणावाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.काही संशोधकांनी यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. विशिष्ट आहाराने तणावाचा सामना करता येईल, असे या संशोधकांचे मत आहे. माणसाला जेव्हा तणाव येतो, तेव्हा त्याला थकवा येतो. शरीर गळल्यासारखे वाटते. हा थकवा घालविण्यासाठी चहा, कॉफीचा पर्याय निवडला जातो. या पेयांमुळे तात्पुरती चेतना मिळते; पण तणावामुळे शरीराचे झालेले नुकसान भरून निघत नाही. त्यापेक्षा काही अन्नपदार्थांमुळे उत्तेजक पेयांपेक्षा वेगळा आणि कायमचा सकारात्मक परिणाम होतो. तणावात असताना माणसाच्या शरीराचीही काही प्रमाणात झीज होते. त्यामुळे शरीरात साठवलेल्या काही पोषक तत्त्वांचाही ऱ्हास होतो. विशेषत: प्रथिने आणि अ, ब, क ही जीवनसत्वे नष्ट होतात. ज्याच्या शरीरामध्ये काही विशिष्ट प्रथिने आणि जीवनसत्वे असतात, ते तणावाचा परिणामकारकपणे सामना करू शकतात. परंतु ज्याच्या शरीरामध्ये मुळातच ही द्रव्ये कमी असतात ते लोक तणावाचा तेवढा परिणामकारकपणे सामना करू शकत नाहीत. वेगळ्या शब्दांत सांगावयाचे झाले तर असे म्हणता येईल की, जे लोक अशक्त असतात, त्यांना तणाव जास्त सहन होत नाही आणि जे सशक्त असतात, त्यांच्याकडे तणाव सहन करण्याची ताकद असते. तणावाचा सामना करण्यासाठी केळी हे उत्तम पर्याय आहे. केळीमध्ये विशिष्ट प्रकारची प्रथिने असतात. ती प्रथिने शरीरातील काही प्रक्रियांमधून सेरोटोनिनमध्ये परिवर्तीत होतात आणि हे सेरोटोनिन आपल्याला तणावाच्या काळात दिलासा देते. आपली मन:स्थिती बदलण्यास मदत करते आणि आपल्याला आनंदी बनवते. केळी खाल्ल्याने वजन वाढते हे खरे आहे; परंतु ज्यांना अजून लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली नसेल त्यांनी अधूनमधून केळी खाल्ली तर त्यांच्या शरीरावर होणारे तणावाचे परिणाम कमी होण्यास मदत होईल. त्याशिवाय सहज उपलब्ध असणारे तणावावरचे दुसरे महत्त्वाचे औषध म्हणजे लिंबू सरबत. लिंबू सरबतातील क जीवनसत्व आपल्याला तणावापासून दिलासा मिळवून देते. (शहर प्रतिनिधी)