महिलानो, चूल आणि मूलच्या चौकटीतून बाहेर या
By Admin | Updated: March 23, 2016 00:49 IST2016-03-23T00:49:11+5:302016-03-23T00:49:11+5:30
ग्रामीण भागातील बहुतांशी महिला ह्या चुल आणि मुल या चौकटीतच जीवनमान जगत आहेत.

महिलानो, चूल आणि मूलच्या चौकटीतून बाहेर या
माधुरी हुकरे यांचे आवाहन : दिघोरी येथे महिला व बाल मेळावा
दिघोरी/ मोठी : ग्रामीण भागातील बहुतांशी महिला ह्या चुल आणि मुल या चौकटीतच जीवनमान जगत आहेत. महिलांनी पुरुषाचे बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कामे करावीत यासाठी शासनाने महिलांना प्रत्येक क्षेत्रासाठी आरक्षीत जागेची व्यवस्था केली आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील महिलंना सुध्दा आपले कर्तुत्व सिध्द करण्याची संधी प्राप्त झाली आहे. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोन करण हे आता तुमच्या हातात आहे. त्यासाठी ‘चुल आणि मुल’ या चौकटीच्या बाहेर या व आपले कर्तृत्व जगाला दाखवून दया असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या माधुरी हुकरे यांनी केले.
लाखांदूर तालुक्यातील दिघोरी/मोठी येथील नगर तैलीक समाज संस्थेच्या आवारात आयोजित महिला व बाल मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच शंकरराव खराबे, पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे, सचिव टी. एम. कोरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. कैकाडे, हिराताई करंजेकार, जासवन नंदेश्वर, हेमराज शहारे, सिंधुबाई रामटेके, मार्कंड हुकरे, संगीता हटकर, सुमित्रा घुबडे, ओम करंजेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी एन. डब्ल्यू. वैतागे, पर्यवेक्षक बालविकास प्रकल्प दिघोरी एच.आर. रहांगडाले प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. कैकाडे यांनी माता व बाळांच्या आहाराबद्दल माहिती दिली. तसचे कुपोषण टाळण्यासाठी उपाययोजना सांगितल्या शिवाय लसीकर व शासनाच्या माता व बाळांसाठी असलेल्या शासकिय योजनांची माहिती दिली.
यावेळी दोन मुलींवर कुटूंब कल्याण योजनेचा लाभ घेणाऱ्या मातांचा सन्मान करण्यात आला. बालविकास प्रकल्प अधिकारी एन. डब्ल्यू. वैतागे यांनी विविध योजनांची माहिती दिली. आंगणवाडी सेविकांनी समुह गीत साजरे केले व त्यामाध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाअगोदर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते बक्षीस देण्यात आले तसेच अंगणवाडी सेविकांनी पोषकतत्वे असलेली पदार्थ बनवून स्टॉल लावला व कसे तयार करायचे व यापासून कोणते पोषकतत्वे मिळतात याबाबत माहिती दिली. संचालन प्राचार्य एन. गायधने यांनी केले. (वार्ताहर)