समाजाच्या उत्थानासाठी संघटित व्हा
By Admin | Updated: March 3, 2016 00:52 IST2016-03-03T00:52:07+5:302016-03-03T00:52:07+5:30
समाजाच्या उत्थानासाठी व शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात सोडण्यासाठी प्रत्येकाने संघटित होणे गरजेचे आहे.

समाजाच्या उत्थानासाठी संघटित व्हा
भंडारा : समाजाच्या उत्थानासाठी व शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात सोडण्यासाठी प्रत्येकाने संघटित होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने यासाठी हेवेदावे बाजूला ठेवून समाजाच्या कार्यात पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन रमेश गिरडे यांनी व्यक्त केले.
भंडारा शहरातील श्री संताजी सेवा मंडळाच्या सभागृहाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. लोकनाथ गिऱ्हेपुंजे हे अध्यक्षस्थानी होते. सभागृहाचे उद्घाटन रमेश गिरडे, यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आ. चरण वाघमारे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, अॅड. आनंद वंजारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी आ.चरण वाघमारे यांनी समाजसेवक म्हणून समाजाच्या प्रत्येक कार्यात व घडामोडीत सहभाग नोंदविण्याचे वचन दिले. संत जगनाडे महाराज यांचे कार्य संस्मरणीय असून नवीन पिढीसाठी ते उपयोगाचे ठरणारे असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही समायोचित भाषणे झाली. संचालन प्रा.प्रेमलाल लांजेवार यांनी केले, आभार गोविंद चरडे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला समाजबांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)