Get fat by adopting the qualities of a saint | संताचे गुण अंगिकारून वसा घ्या

संताचे गुण अंगिकारून वसा घ्या

ठळक मुद्देअशोक चरडे महाराज : एकोडी येथे प्रबोधन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
एकोडी : संताच्या कार्याचा सदैव विचार करून त्यांनी केलेल्या कार्याचा समाजात सुगंध दरवळून समाजसेवेचा वसा घ्यावा असे प्रतिपादन हभप प्रा.अशोक चरडे महाराज यांनी केले.
साकोली तालुक्यातील एकोडी येथे संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या गोपालकाल्याच्या कीर्तनात ते प्रबोधन करीत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी, होमराज कापगते, नंदू समरीत, देवराव भांडारकर, शंकर राऊत, येथील सरपंच भूमीता तिडके, उपसरपंच राहुल समरीत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अभिषेक व घटस्थापना करून करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी एकोडी नगरीतून श्रींची पालखी काढण्यात आली. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आला. आरती व गोपालकाल्याने सांगता करण्यात आली. प्रास्ताविक योगराज खोब्रागडे यांनी केले. संचालन प्रा.सचिन तिडके यांनी, तर आभार डॉ.रमेश दुरुगकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रभू भुरे, वासुदेव तिडके, गोपीचंद तरोणे, सेवकराम दुरुगकर, मंगेश खेडीकर, मेघा बन्सोड, शिवशंकर द्रुगकर, योगराज खोब्रागडे आदींनी सहकार्य केले

Web Title: Get fat by adopting the qualities of a saint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.