रोजगाराभिमुख शिक्षण घेणे काळाची गरज

By Admin | Updated: July 15, 2015 00:43 IST2015-07-15T00:43:59+5:302015-07-15T00:43:59+5:30

नोकरी असो वा व्यवसाय. नोकरी करावी की व्यवसाय? हा मोठा यक्ष प्रश्न आजच्या तरूण पिढीसमोर उभा आहे.

To get employment oriented education is the need of the hour | रोजगाराभिमुख शिक्षण घेणे काळाची गरज

रोजगाराभिमुख शिक्षण घेणे काळाची गरज

मार्गदर्शन कार्यक्रम : अनिल कुर्वे यांचे प्रतिपादन
भंडारा : नोकरी असो वा व्यवसाय. नोकरी करावी की व्यवसाय? हा मोठा यक्ष प्रश्न आजच्या तरूण पिढीसमोर उभा आहे. त्यात नोकरी मिळावी म्हणून सततच्या धडपडीतून नैराश्यच हाती लागत आहे. अशावेळी एखादा अभ्यासक्रम नोकरीसोबतच व्यवसायाची संधी उपलब्ध करून देत असेल तर या दुहेरी संधीच सोनं कराव मोठ्या शहरातच नव्हे तर या भंडारा जिल्ह्यातही तांत्रिक अतांत्रिक पॅरामेडिकल, संघनक व संबंधित इतर निरनिराळे अभ्यासक्रम सुरू आहेत. हेच रोजगार देणारे शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन डॉ. अनिल कुर्वे याननी केले. लोकमत इव्हेंट ग्रृपतर्फे आयोजित 'गुण कमी आता पुढे काय' कार्यशाळेत यांनी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. कुर्वे म्हणाले, रोजगार नाही म्हणून निराशून बसण्यापेक्षा रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षणाकडे वळा, रोजगारभिमुख अनेक अभ्यासक्रम असले तरी विद्यार्थ्यांना आर्थिकरित्या झेपतील याचादेखील विचार करावा लागेल. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ मुंबईद्वारा अनेक अभ्यासक्रम सुरू आहेत. ते पूर्ण करून आज अनेक तरूण तरूणी स्वत:च्या पायावर उभे आहेत. वर्ग १० वी, १२ वी, उत्तीर्ण अनुत्तीर्ण व पुढे कोणत्याही शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता व्यवसायीक शिक्षणात १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष या प्रकारचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम जसे पॅरामेडिकल नर्सिंग केअर इत्यादी, शिक्षण घेवून नोकरी म्हणून रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. असेही त्यांनी सांगितले.
संचालन जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार तर आभार जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे यांनी मानले. स्रेहा वरखडे, शिल्पा न्यायखोर, राखी सूर, अर्चना गुर्वे व सौरभ खोत यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)

सखी सदस्यांना कढई सेट वितरण उद्या
भंडारा : लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियान २०१५ चे खान मॅरेज हॉल येथे आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम दरम्यान करण्यात आलेल्या सदस्य नोंदणीत उर्वरित एकूण १० कढई सेट वितरण दि. १६ जुलै रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत येथील खात रोड स्थित पुष्कर रामनगर, सीमा सतीश नंदनवार यांच्या राहत्या घरी करण्यात येईल. सदस्य क्रमांक १७२३८, १७२३९, १७२४५, १७२४७, १६९७१, १६९७४, १६९७५, १६९७६ व २३६४६ प्रमाणे सदस्यांनी कार्ड व आयडीसह प्रत्यक्ष सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: To get employment oriented education is the need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.