भंडारा अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:21+5:302021-04-06T04:34:21+5:30
बँकेच्या मुख्य कार्यालयात आभासी पद्धतीने घेण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष नाना पंचबुद्धे होते. या सभेत ३३१ सभासद ऑनलाईन ...

भंडारा अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा
बँकेच्या मुख्य कार्यालयात आभासी पद्धतीने घेण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष नाना पंचबुद्धे होते. या सभेत ३३१ सभासद ऑनलाईन पद्धतीने सभासद झाले होते. नाना पंचबुद्धे यांनी बँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा सादर केला. त्यानुसार ३१ मार्च २०२० अखेर ठेवी ५२२.५१ कोटी, कर्ज २८३.५० कोटी, नफा ११२ कोटी प्राप्त झाल्याचे सांगितले. कोरोना प्रादुर्भावामुळे उदभवलेली परिस्थिती व बँकेचे भांडवल सुरक्षित राखणे शक्य व्हावे यासाठी नफ्याच्या विवरणातून सभासदांना देण्यात येणाऱ्या लाभांशावर निर्बंध घातले असल्याचे सांगण्यात आले. सभेला उपाध्यक्ष ॲड. जयंत वैरागडे, हिरालाल बांगडकर, रामदास शहारे, पांडुरंग खाटीक, जगदीश निंबार्ते, ॲड. कविता लांजेवार, दिनेश गिरीपुंजे, उद्धव डोरले, महेंद्र गडकरी, हेमंत महाकाळकर, लिलाधर वाडीभस्मे, ज्योती बावनकर, सुमीत हेडा, ॲड. विनयमोहन पशिने उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश मदान यांनी केले.