गायत्री बोरवेल्सला ७० हजारांचा दंड

By Admin | Updated: August 2, 2014 23:56 IST2014-08-02T23:56:25+5:302014-08-02T23:56:25+5:30

शहरातील रुक्मीणी नगरातील जयगोपाल गायधने यांनी गायत्री एजन्सीज बोरवेल अँड मशिनरी यांच्याकडून घरी बोरवेल खोदली होती. त्याकरीता निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविण्यात आले.

Gayatri Borvels gets 70 thousand fine | गायत्री बोरवेल्सला ७० हजारांचा दंड

गायत्री बोरवेल्सला ७० हजारांचा दंड

ग्राहक मंचचा निकाल : निकृष्ट साहित्य पुरविल्याचा फटका
भंडारा : शहरातील रुक्मीणी नगरातील जयगोपाल गायधने यांनी गायत्री एजन्सीज बोरवेल अँड मशिनरी यांच्याकडून घरी बोरवेल खोदली होती. त्याकरीता निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविण्यात आले. याप्रकरणी गायधने यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागितली असता ग्राहक मंचने गायत्री बोरवेल्सचे उमेश बडवाईक यांच्याविरुद्ध निकाल देताना गायधने यांना ७० हजार रुपयांची भरपाई देण्याचा दंड ठोठावला.
रुक्मीणी नगरातील जयगोपाल गायधने यांनी स्वत:चे घरी उमेश बडवाईक यांच्या गायत्री एजन्सीज बोरवेल अँड मशिनरी च्या माध्यमातून केसींग पाईपसह बोरवेलचे काम २०१२ मध्ये केले. यात २४६ फूट खोदकाम करण्यात आले. त्यात २१० फुटावर पाणी लागले. याकरीता बडवाईक यांनी २७० फुट केसींग पाईप स्वत:च्या दुकानातून विक्रीस दिले. या बदल्यात ४६ हजार ८६० रुपये गायधने यांच्याकडून घेण्यात आले.
यासोबतच भाष्कर तिघारे यांच्या ओम साई इलेक्ट्रीक अँड मशिनरी या दुकानातून १९ हजार ४१० रुपये किंमतीचा सबमर्सिबल पंप घेण्यात आला. काही दिवस सुरळीत गेले. सहा महिन्यानंतर बोरवेलमधून गढूळ पाणी येऊ लागल्याने गायधने याची तक्रार तिघारे व बडवाईक यांच्याकडे केली. याबाबत तिघारे यांनी गायधने यांची तक्रारीची पुष्टी करण्याच्या दृष्टीने सबमर्सीबल बाहेर काढले. यावेळी बडवाईक यांच्याकडून टाकण्यात आलेल्या दोन केसींग पाईपचे तुकडे आढळले. यावरुन बडवाईक यांनी निकृष्ट दर्जाचे पाईप दिल्याचे स्पष्ट झाले. याबाबत गायधने यांनी वारंवार गायत्री बोरवेल्सचे बडवाईक यांच्याकडे खेटा घातल्या. मात्र त्यांनी नेहमी उडवाउडवीचे उत्तरे देऊन गायधने यांना केसींग पाईप बदलवून देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी त्यांनी ग्राहक तक्रार मंचकडे तक्रार दाखल केली. यात तक्रार मंचचे अध्यक्ष अतुल आळसी, सदस्या गीता बडवाईक, हेमंतकुमार पटेरिया यांच्या गणपूर्तित सर्व साक्षपुरावे व कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात गायत्री बोरवेल्सचे उमेश बडवाईक यांनी निकृष्ट दर्जाचे पाईप पुरवठा केल्याचे सिद्ध झाले. यामुळे त्यांच्याविरुद्ध अंतिम निर्णय देताना गायधने यांना नुकसान भरपाईपोटी ३० हजार रुपये, तक्रार दाखल केल्यापासून आठ टक्के व्याज दराने द्यावे, सबमर्सीबल पंप व त्याला लागणारे साहित्याचे नुकसान भरपाई म्हणून १९ हजार ४१० रुपये, मानसिक त्रासापोटी १५ हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार रुपये असे ६९ हजार ४१० रुपये ३० दिवसाचे आत देण्याचा निर्णय देण्यात आला. या निर्णयाने बोरवेल्स चालकांचे धाबे दणाणले असून गायधने यांच्याकडून अ‍ॅड.हरडे यांनी बाजू मांडली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gayatri Borvels gets 70 thousand fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.