गोवारी बांधवांनी न्यायालयीन लढ्यात सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:04 IST2017-09-07T00:04:00+5:302017-09-07T00:04:19+5:30

आदिवासी गोवारी जमातीच्या आपआपसातील मदभेद विसरून व संघटीत होऊन समाजहित जोपासावे. यासाठी संवैधानिक न्यायालयीन लढ्यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन झेड.आर. दुधकुवर यांनी व्यक्त केले.

Gawai brothers should join the judicial battle | गोवारी बांधवांनी न्यायालयीन लढ्यात सहभागी व्हावे

गोवारी बांधवांनी न्यायालयीन लढ्यात सहभागी व्हावे

ठळक मुद्देझेड.आर. दुधकुवर : आदिवासी गोवारी जमात जिल्हास्तरीय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आदिवासी गोवारी जमातीच्या आपआपसातील मदभेद विसरून व संघटीत होऊन समाजहित जोपासावे. यासाठी संवैधानिक न्यायालयीन लढ्यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन झेड.आर. दुधकुवर यांनी व्यक्त केले.
संताजी मंगला कार्यालय भंडारा येथे पार पडलेल्या आदिवासी गोवारी जमातीच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला डॉ. आनंद नेवारी, हेमराज नेवारी, मनिष सहारे, नामदेव ठाकरे, गुरूदेव भोंडे, काळसर्पे आदींची उपस्थिती होती.
आदिवासींच्या हक्कासाठी २३ नोव्हेंबर १९९४ ला ११४ बांधव शहिद झाल्यानंतरही आदिवासींचे हक्क मिळालेले नाही. यावर चिंतन करून राजकीय व न्यायालयीन मार्गापैकी न्यायालयीन मार्गानेच गोवारी जमातीला न्याय मिळेल, या दृढ विश्वासाने तत्कालीन स्वयंभू नेत्यांच्या विरोधाला जुगारून आदिवासी गोंडगोवारी सेवा मंडळची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दोन याचिका दाखल करण्यात आल्या. या न्यायालयीन लढाईसाठी समाज बांधवांनी जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी, असेही प्रतिपादन दुधकुवर यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाचे संचालन हेमराज राऊत यांनी केले. आभार ताराचंद सोनवाने यांनी मानले. कार्यक्रमाला विष्णू शहारे, युवराज नेवारे, ज्ञानेश्वर वाघाडे, प्रा. राऊत, श्यामराव नेवारे, रमेश राऊत, सत्यवान राऊत, काळसर्पे, सुधांशू नेवारे, श्रीकृष्ण ठाकरे, सदानंद शहारे, रॉबिन नेवारे यांच्यासह समाज बांधवांनी सहकार्य केले.

Web Title: Gawai brothers should join the judicial battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.