विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:31+5:302021-03-28T04:33:31+5:30
लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील स्नेहा कन्या विद्यालयात मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटच्या वितरण समारंभाचे आयोजन करण्यात ...

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यकच
लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील स्नेहा कन्या विद्यालयात मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटच्या वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका गीता बोरकर, सहायक अधिकारी प्रियंका रागीट, समुदाय समन्वयक भुवनेश्वरी दोनोडे, वीणा ब्राह्मणकर, मॅजिक बसचे तालुका कार्यवाह वीरेंद्र देशमुख, विभागप्रमुख प्रेरणा कंगाले, शाळेतील शिक्षक भीमराव मेश्राम, सुभाष कापगते, श्रीराम सार्वे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
मॅजिक बस फाउंडेशनचे तालुका कार्यवाहक वीरेंद्र देशमुख, प्रियंका रागीट यांच्या हस्ते मुख्याध्यापिका गीता बोरकर यांच्याकडे किट सुपूर्द करण्यात आले. यावेळी देशमुख यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शालेय वयातच अंगभूत कौशल्य जोपासणे गरजेचे असून, आपल्या आवडीनिवडी जोपासण्याचा हाच खरा काळ असल्याचे सांगितले. प्रियंका रागीट यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःमधील क्षमता ओळखून स्वतःच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी झोकून देत शिक्षकांचे मार्गदर्शन अमूल्य असल्याचे सांगितले. संचालन विलास कालेजवर यांनी केले तर आभार छबीलाल गिरीपुंजे यांनी मानले.